गोंदिया,
Ladki Bahin Yojana राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेपासून अर्जदार महिला वंचित राहू नये, यासाठी या योजनेकरिता स्वतंत्र प्रभार देण्यात यावा, अशी मागणी गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. तसे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले. राज्यातील महिलांना व मुलींना सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती, सशक्तीकरणाला चालना देणे, महिलांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबन व आत्मनिर्भर व्हाव्यात राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांसाठी सुरु केली.
त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरु झाली आहे. दरम्यान योजनेतील जाचक अटी शिथिल केल्या. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव, ऑनलाईन कामात येणारे अडथळे, यंत्रणेतील कर्मचार्यांची कमतरता आदी कारणामुळे अनेक अर्जदार योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता स्वतंत्र प्रभार देऊन एका अधिकार्याची त्वरीत नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.Ladki Bahin Yojana निवेदन देताना शहर अध्यक्ष नानू मुदलीयार, खालिद पठाण, राजू भगत, संजय सोनुने, झनकलाल ढेकवार, टी. एम. धुवारे, तरंग जायस्वाल, अनुज जायस्वाल, राजेश वर्मा, तुषार उके, शरभ मिश्रा, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.