शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या देयकांचा निपटारा लवकरच

    दिनांक :03-Jul-2024
Total Views |
- दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई, 
अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची विविध देयके अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता नव्हती. आता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या सर्व देयकांचा तातडीने निपटारा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री Deepak Kesarkar दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.
 
 
Deepak Kesarkar
 
अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची विविध देयके 2020-21 पासून प्रलंबित आहेत. थकीत देयके पारित होण्यासाठी शिक्षण संचालक, उपसंचालक स्तरावरील मान्यतेची गरज आहे. आणि या कार्यालयाला वशिला किंवा लाच दिल्याशिवाय तेथून मंजुरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने, शासनाने याची तातडीने गंभीर दखल घ्यावी, याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री Deepak Kesarkar केसरकरांनी सदर माहिती दिली.
 
 
संबंधितांची देयके आर्थिक तरतूद नसल्याने प्रलंबित होती. त्यासंदर्भात निधीची तरतूद करण्यात आली असून, देयके अदा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. या देयकांच्या प्रस्तावात आढळून येणार्‍या त्रुटींची पूर्तता लवकर होण्याच्या दृष्टीने त्रुटींची एक चेकलिस्ट तयार केली जाईल, जेणेकरून एकदाच सर्व त्रुटींची माहिती संबंधितांना होईल. या संदर्भात प्राप्त तक‘ारींचे अवलोकन करून आवश्यकता असल्यास उचित कार्यवाही करण्यात येईल तसेच वारंवार त्रुटी काढल्या जाणार नाहीत, यासाठीची नियंत्रणात्मक व्यवस्था केली जाईल, देयकांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल, असे Deepak Kesarkar केसरकर यांनी सांगितले.