तोशखाना प्रकरणात इम्रान खान निर्दोष

    दिनांक :03-Jul-2024
Total Views |
- न्यायालयाचा दिलासा
 
इस्लामाबाद, 
तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान Imran Khan innocent इम्रान खान यांना अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील एका खटल्यात पाकिस्तानच्या न्यायालयाने बुधवारी खान आणि त्यांच्या पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या अन्य नेत्यांमध्ये शाह महमूद कुरेशी, शेख रशीद, असद कैसर, शहरयार आफ्रिदी, फैजल जावेद, राजा खुर्रम आणि अली नवाज अवान यांचा समावेश आहे.
 
 
Imran Khan
 
न्यायदंडाधिकारी यासिर महमूद यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळावी यासाठी केलेल्या याचिकांवर सुनावणी करून निर्णय सुरक्षित ठेवला होता. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी निवडणूक आयोगाने 2022 मध्ये माजी पंतप्रधान Imran Khan innocent इम्रान खान यांना अपात्र ठरवले होते. याचा निषेध केल्याबद्दल इम्रान खान आणि इतर नेत्यांविरोधात आबपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तोशखानाचे नियम
पाकिस्तानी कायद्यानुसार, कोणत्याही परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी म्हणजेच तोशखानामध्ये ठेवावी लागते. मिळालेली भेटवस्तू पंतप्रधानांना स्वत:कडे ठेवायची असेल, तर त्यांना भेटवस्तूच्या किमतीइतकी रक्कम भरावी लागते. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशखान्यात जमा केल्या जातात किंवा त्यांचा लिलाव करून त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा केला जातो.