मुंबई,
एका पक्षाचे प्रमुख, माजी मुख्ययमंत्री, विद्यमान आमदार उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक असलेले मिलिंद नार्वेकर यांचे शिक्षण केवळ 10 वी पर्यंत झाले आहे. एखादा साधारण आमदार देखील स्वीय सहायक नियुक्त करताना तो उच्चशिक्षित असतो. असे असताना ठाकरेंनी आपला ‘पीए’ केवळ 10 पास ठेवला, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी संख्याबळ नसताना केवळ मविआच्या जीवावर आपले स्वीय सहायक Milind Narvekar मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
यानिमित्ताने नार्वेकरांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या त्यांच्या शपथपत्रातून आपण केवळ 10 पास असल्याचे जाहीर केले आहे.
मागील काळात ऐकण्यात आले होते की, नार्वेकर केवळ स्वीय सहायक नसून, ते ठाकरेंचे सल्लागार आहेत. बर्याच विषयात ठाकरे नार्वेकरांच्या सल्ल्याने चालतात आणि हो महत्त्वाचे म्हणजे, राज ठाकरे, नारायण राणे, भास्कर जाधव यांच्यासोबतच आता उठाव करून गेलेल्या आमदारांनी सातत्याने याच 10 वी पास ‘पीए’च्या नावाने बोटं मोडल्याचे दिसले आहे. भास्कर जाधवांसह आता ठाकरेंना सोडून गेलेल्यांनी आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले, असे म्हटले होते. अर्थात् उद्धव ठाकरेंना दोन-तीन लोकांनी घेरून ठेवले असून, त्यात संजय राऊतांसह Milind Narvekar मिलिंद नार्वेकरांचाही समावेश असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
शिक्षण कमी मात्र, मालामाल
Milind Narvekar मिलिंद नार्वेकर यांनी शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. श्री बालाजी कॉम. एलएलपी कंपनी आहे. त्यात 50 टक्के शेअर्स त्यांचे तर पत्नीचे 50 टक्के शेअर्स आहेत. त्यांनी 10 कोटी 11 लाख 28 हजार रुपयांची, तर त्यांच्या पत्नीने 31 कोटी 25 लाख 33 हजार रुपयांची गुंतवणूक शेअरमध्ये केली आहे. मिलिंद नार्वेकर व त्यांच्या पत्नीकडे सोने चांदी व हिर्यांचे कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि मुंबई, बीड, कोकण, बंगळुरूसार‘या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा जमीनजुमला आहे.