विद्युत वितरण कंपनी चा मनमानी कारभार

    दिनांक :03-Jul-2024
Total Views |
कारंजा लाड
electricity company येथील विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाशी संबंधित कामे मोठ्या प्रमानत प्रलंबित असून अधिकारी मनमानी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. कारंजा विद्युत वितरण कंपनीकडे अनेक ग्राहकांनी विद्युत मिटर अधिकृत पणे मिळावे या साठी अर्ज केले आहे. परंतु, अशा ग्राहकांना बगल देत चिरीमिरी वाल्यांना त्वरित मिटर मिळत असल्याचा आरोप होत आहे.
 
 
dhfgfg
 
 
काही ठिकाणी विद्युत खांब शिफ्टिंग कामे शासकीय नियम धाब्यावर बसवून केल्या जात आहेत. काही अधिकारी सर्व नियमाला बगल देत परस्पर कामे हाताळत असल्याच्या तक्रारी आहेत. कारंजा शहर व ग्रामीण भागात मेन्टेनन्स च्या नावावर केव्हाही वीज पुरवठा बंद केल्या जातो. दरवर्षी विद्युत वितरण कंपनीकडून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला मान्सूनपूर्व निधी मिळत असतो, या निधीचा वापर करून मान्सूनपूर्व सर्व तयारी या खर्चातून होत असते.electricity company परंतु, वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपुर्व कामे थातुरमातूर केल्या जात असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. महावितरण च्या कारभाराला जनता कंटाळली असून त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.