वर्धा,
statue of Lokmanya Tilak तत्कालीन नगराध्यक्ष रमेश शेंडे यांनी स्थानिक गोलबाजारात 15 ऑगस्ट 1985 रोजी लोकमान्य टिळकांचा अर्धकृती पुतळा उभारला. आज मात्र तो पुतळा पुर्णपणे दुर्लक्षित असुन पुतळ्या भोवती घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. या पुतळ्याची त्या घाणीच्या साम्राज्यातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी आता लोकमान्य टिळकांनाच करावी लागणार काय असा प्रश्न निर्माण झाला. 23 रोजी जयंतीला नाममात्र स्वच्छ झालेला परिसर आज पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला अतिशय घाणीत उभा होता.
statue of Lokmanya Tilak सेवाग्राम विकास आराखड्यात शहरातील गोलबाजारातील लोकमान्य टिळकांचा पुतळा सोडाला तर सर्व पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र, स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा पुतळा गोल बाजारात घाणीच्या साम्राज्यात आहे. जयंतीदिनी गिट्टीचा चुरा टाकून त्या परिसराची स्वच्छता केली करण्यात आली. उद्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. नगर पालिकेच्या वतीने किमान पूर्वसंध्येला या परिसराची स्वच्छता करणे अपेक्षित होते. परंतु, आज 31 रोजी सायंकाळी या परिसरात जनावरांचा मुक्त संचार आणि घाणीचे साम्राज्य होते.