मंगरुळनाथ,
Mahamorcha of Baliraja बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम जिल्हा तथा विदर्भ संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्त शेतकर्याच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा विभागिय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ जूलै रोजी धडकला.
प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मोर्चा ची सूरूवात सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हारार्पन करुन करण्यात आली. हा मोर्चा येथून पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बस स्टॅण्ड, ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत जावून तेथे सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व त्यांच्याच मार्फत शासनास निवेदन देण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदी धारक शेतकर्यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळणे बाबत. प्रकल्पग्रस्तांचे ५ टक्के हून आरक्षण १५ टक्के करण्यात यावे.तसेच महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेणे शासकीय नौकरी देणे शय न झाल्यास एक रक्कमी २० लक्ष रूपये देण्यात यावे आदीसह इतर मागण्याचा समावेश आहे.Mahamorcha of Baliraja यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवदास पाटील ताठे, बाबुसिंगजी पवार काका, भाऊसिंगजी राठोड, शिवाजी घुगे, मुख्तार पटेल, नंदकिशोर कांबळे, संजय भरदूक, संदीप गुल्हाने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, अकोला जिल्हाध्यक्ष मनिषा चक्रनारायण, संतोष चक्रनारायण, रविंद्र श्रृंगारे, सुभाष गुल्हाने, संतोष भिसडे, राधेश्याम शिरसाठ, महादेव निंबोकार आदसह शेकडो प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष सहभागी झाले होते. समारोपीय कार्यक्रम मध्ये संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, डॉ. सिद्धार्थ देवळे, नारायण विभुते, मुख्तार खान पटेल, राहुल वैद्य, गजानन शिंदे, जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे यांची भाषणे झाली.