माझी लाडकी बहीण...

Maharashtra-Ladki bahin खटाखट योजना फसवी

    दिनांक :04-Jul-2024
Total Views |
वेध
 
- नंदकिशोर काथवटे
Maharashtra-Ladki bahin लोकसभा निवडणुकीत एकीकडे काँग्रेसने मते मिळविण्यासाठी लोकांना साडेआठ हजार रुपये खटाखट देऊ, असे आश्वासन दिले होते. अद्याप एकाही व्यक्तीच्या खात्यात ते पैसे खटाखट आलेले नाहीत. Maharashtra-Ladki bahin यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. काही जणांनी तर पैशासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. Maharashtra-Ladki bahin मात्र, कुणालाच खटाखट पैसे मिळाले नाहीत. याउलट पटापट राज्यातील दु:खी, पीडित आणि गरीब महिलांना १५०० रुपये देण्याची घोषणा करून हजारो महिलांना महायुतीच्या शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. Maharashtra-Ladki bahin ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' घोषित करून महायुती सरकारने राज्यभरातील हजारो महिलांना जणू माहेरचा आहेर दिला आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने गरीब, विधवा, घटस्फोटित या महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे.Maharashtra-Ladki bahin हेही वाचा : चेंगराचेंगरी टाळण्यासाठी...
 
 

Maharashtra-Ladki bahin 
 
 
सुरुवातीला ही योजना २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांसाठी घोषित करण्यात आली होती. नंतर या योजनेत सुधारणा करीत शिंदे-फडणवीस सरकारने योजनेची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे केली आहे. या योजनेसाठी आता २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरतील. याशिवाय योजनेकरिता अर्ज दाखल करण्याची मुदतही सरकारने वाढवून दिली असून आता या योजनेतील लाभार्थी महिलांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. Maharashtra-Ladki bahin  अतिशय स्तुत्य उपक्रम या योजनेच्या माध्यमातून महायुतीने राबविण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यभरातील हजारो महिलांच्या चेहऱ्यावर यानिमित्ताने हसू फुलले आहे. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद महायुती सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थींना मिळावा, राज्यभरातील गरीब आणि पीडित महिला या योजनेत सहभागी व्हाव्यात, यासाठी आता प्रशासनानेदेखील नेटाने काम करण्याची गरज आहे.
 
 
Maharashtra-Ladki bahin गरीब आणि पीडित महिला या योजनेतून सुटू नयेत, त्यांना कुठल्याही परिस्थितीत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी युद्ध पातळीवर प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. ३१ ऑगस्टपर्यंत या लाडकी बहीण योजनेत सहभागी होता येणार असल्याने महिलांनी आपला संयम न सोडता अर्ज दाखल करताना घाई करू नये. योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व इतरही शासकीय कार्यालयांमधून या योजनेचा अर्ज दाखल करता येणार आहे. जमिनीच्या माहितीची अट सरकारने शिथिल केली असून उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसणाऱ्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी या योजनेविरोधात केलेला कांगावा पुरता फोल ठरला आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक जाचक अटी आहेत, या योजनेसाठी १५ दिवसांंत अर्ज दाखल करणे शक्य नाही, असा आरोप करीत महायुती सरकारविरोधात ओरड करण्यात आली.
 
Maharashtra-Ladki bahin मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेतील अनेक अटींमध्ये सूट देत योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने विरोधक तोंडघशी पडले आहेत. आधी या योजनेकरिता अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते. आता लाभार्थीकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. याशिवाय योजनेतून पाच एकर शेतीची अटही वगळण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता या योजनेत सहभागी होण्यासाठी कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सरकारने आपल्या राज्यभरातील भगिनींसाठी आणलेली ही लाडकी बहीण योजना गरीब महिलांनी डोक्यावर घेतली आहे. त्यांच्यासाठी सरकारने दिलेली माहेरची ही भेट असून या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सूक आहेत. सरकारने ही योजना अंमलात आणण्यासाठी घेतलेला पटापट निर्णय राहुल गांधींची खटाखट योजना फसवी असल्याचे दर्शवितो.
 
 
९९२२९९९५८८