अनंत-राधिकाच्या संगीतासाठी जस्टिन बीबर भारतात!

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
मुंबई, 
Justin Bieber in Anant-Radhika सध्या रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरी त्यांच्या लाडक्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा ग्रॅण्ड वेडिंग १२ जुलैला होणार आहे. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच अंबानींच्या घरी ‘मामेरू’ हा कार्यक्रम पार पडला. यानंतर आता अनंत-राधिकाच्या कॉन्सर्टची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमासाठी जस्टिन बीबर खास भारतात आला आहे. शुक्रवारी सकाळी जस्टिन बीबर मुंबई विमानतळावर दाखल होताच त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
 
 
virat
 
जस्टिन गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि डोक्यावर लाल टोपी घातलेला दिसत होता. यापूर्वी तो 2017 मध्ये भारतात आला होता. आता प्रसिद्ध हॉलिवूड गायक अंबानींच्या घरी एका संगीत कार्यक्रमासाठी 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात दाखल झाला आहे. हा व्हिडिओ पापाराझी इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. Justin Bieber in Anant-Radhika 5 जुलैच्या रात्री अनंत-राधिकाचा संगीत सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबीय विशेष तयारी करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जस्टिन बीबरला अंबानीच्या "सेलिब्रेशन ऑफ हार्ट्स" कॉन्सर्टमध्ये काही तासांसाठी परफॉर्म करण्यासाठी $10 मिलियन (रु. 83 कोटी) दिले जातील. जस्टिनचे मानधन ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण, या हॉलिवूड गायिकेने रिहानापेक्षा जास्त फी घेतली आहे.
दरम्यान, आज अंबानींच्या घरी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येणार आहे. Justin Bieber in Anant-Radhika याआधी जामनगरमध्ये आयोजित प्री-वेडिंग कार्यक्रमात हॉलिवूड गायिका रिहानासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. पुढील आठवड्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट पारंपरिक हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. हे जोडपे 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या दिवशी पाहुण्यांसाठी खास पारंपरिक थीम ठेवण्यात आली आहे. राधिका मर्चंटबद्दल सांगायचे तर ती एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची मुलगी आहे.