विनोद तावडे बिहार, प्रकाश जावडेकर केरळचे प्रभारी

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Vinod Tawde-Prakash Javadekar : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज काही राज्यांसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याकडे पुन्हा एकदा बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. प्रकाश जावडेकर यांनाही केरळचे प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले.
 
 
Vinod Tawde-Prakash Javadekar
 
खा. दीपकप्रकाश बिहारचे तर, अपराजिता सारंगी केरळच्या सहप्रभारी राहणार आहेत. मध्यप्रदेशचे प्रभारी म्हणून डॉ. महेंद्रसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, सतीश उपाध्याय सहप्रभारी आहेत. छत्तीसगडचे प्रभारी म्हणून आमदार नितीन नवीन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. आशीष सूद गोव्याचे तर डॉ. सतीश पुनिया हरयाणाचे प्रभारी म्हणून काम करणार आहेत. खा. सुरेंद्रसिंह नागर हरयाणाचे सहप्रभारी आहेत.
 
 
Vinod Tawde-Prakash Javadekar : आमदार श्रीकांत शर्मा हिमाचल प्रदेशचे प्रभारी असून, संजय टंडन सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. तरुण चुघ यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी तर आशिष सूद यांच्याकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. खा. लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. डॉ. राधामोहनदास अग्रवाल यांच्याकडे कर्नाटकचे प्रभारी म्हणून तर सुधाकर रेड्डी यांच्याकडे सहप्रभारी म्हणून दायित्व देण्यात आले. राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे यांना मणिपूरचे तर, रघुनाथ कुळकर्णी यांना अंदमान निकोबारचे प्रभारी म्हणून उत्तरदायित्व देण्यात आले.
 
 
Vinod Tawde-Prakash Javadekar : विजयपालसिंह तोमर ओडिशाचे प्रभारी तर, लता उसेंडी सहप्रभारी राहणार आहेत. पंजाबचे प्रभारी म्हणून विजय रूपानी तर, सहप्रभारी म्हणून डॉ. नरिंदरसिंह राहणार आहेत. दुष्यंतकुमार गौतम उत्तराखंडचे प्रभारी तर, रेखा वर्मा सहप्रभारी आहेत. ईशान्य भारताचे संयोजक म्हणून खासदार डॉ. संबित पात्रा तर, सहसंयोजक म्हणून व्ही. मुरलीधरन् यांना नियुक्त करण्यात आले आहे.