अमेरिकेत ज्यूविरोधी आंदोलन

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
विश्व
Jewish people: हमासविषयी निष्ठा असणार्‍या इस्लामिक दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी ज्यू महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना ठार केल्याने जागतिक समुदाय संतप्त झाला होता. या घटनेला जून 2024 मध्ये आठ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अमेरिकेतील शैक्षणिक संस्था इस्रायलविरोधी आणि ज्यूविरोधी आदोलन का करीत आहेत हे कळायला मार्ग नाही. हार्वर्ड विद्यापीठातील Jewish people यहूदी/ज्यू विद्यार्थी संघटना हार्वर्ड चाबडच्या रब्बी हिर्शीने विद्यापीठाचे अध्यक्ष क्लॉडिन गे यांना एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. तेव्हा त्यांच्या कार्यालयाने आयोजकांना कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याचे खेदपूर्वक सांगत तसे पत्र पाठवले. अमेरिकन कॅम्पसमध्ये, विशेषकरून हार्वर्ड, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ (पेन) येथे वाढत्या यहूदी विरोधी भावनेबद्दल (सेमिटिझम) हार्वर्ड विद्यापीठातील यहूदी/ज्यू विद्यार्थी संघटना हार्वर्ड चाबड काँग्रेसपुढे होणार्‍या साक्षीसाठी तयारी करीत होती.
 
 
USA-2
 
चाबड ही संघटना संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायली राजदूताच्या उपस्थितीत हमासच्या अत्याचारांची डाक्युमेंटरी (माहितीपट) दाखवणार होती. अनेक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि देणगीदारांनी अध्यक्ष गे यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आग्रह धरत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमामुळे अध्यक्षांना एक नवीन दृष्टिकोन मिळेल, असा या माजी विद्यार्थ्यांचा युक्तिवाद होता. परंतु याचा काही उपयोग झाला नाही.
 
 
Jewish people  अध्यक्ष क्लॉडिन गे यांनी कुठलेतरी कारण देऊन निमंत्रण नाकारले असले तरी ते सुनावणीत सपशेल अपयशी ठरले. ‘यहूदी/ज्यूंच्या नरसंहाराचे आवाहन केल्याने त्यांच्या संबंधित संस्थांच्या धमकावणी आणि छळाच्या नियमांचे उल्लंघन झाले की नाही’ या प्रश्नाला क्लॉडिन गे आणि काँग्रेस (परिषद) ची महिला सदस्य एलिस स्टेफनिक सभागृहाच्या प्रतिनिधींना खात्रीपूर्वक उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे यहूदी विद्यार्थ्यांबाबत पक्षपात करणार्‍या अध्यक्षांना पदावरून काढून टाकावे अशी आग्रही मागणी माजी ज्यू विद्यार्थ्यांनी आणि देणगीदारांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केली.
 
 
इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 च्या Jewish people ज्यू लोकसंहारानंतर अगदी लगेचच काही उच्चभ्रू यूएस कॅम्पसमध्ये इस्रायलविरोधी आणि काही प्रकरणांमध्ये ज्यूविरोधी निदर्शने सुरू झाली. इस्रायलमधील हा नरसंहार भयानक होता. तिथे हमासच्या दहशतवाद्यांनी स्त्रिया, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे 1,400 ज्यूंची हत्या केली. अमेरिकेतील शैक्षणिक परिसरातील प्राध्यापकांसह अनेक निदर्शकांनी इस्रायलच्या ज्यू राज्याचा नाश करण्याची शपथ घेतलेल्या हमास या दहशतवादी संघटनेलाही आपला पाठिंबा घोषित केला. उदाहरणार्थ कॉर्नेल विद्यापीठातील एका प्राध्यापकाने ‘हमासचे हल्ले ‘प्रफुल्लित करणारे’ आणि ‘ऊर्जावान’ असल्याचे म्हटले. तर येल विद्यापीठातील एका प्राध्यापकाने इस्रायलला ‘एक खुनी, नरसंहार करणारे’ राज्य म्हटले.
 
 
इस्रायलला दोष, मात्र नरसंहाराकडे दुर्लक्ष
हार्वर्ड विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर एक निवेदन प्रकाशित केले. या निवेदनात विद्यार्थ्यांनी हिंसाचार पसरविल्याबद्दल केवळ इस्रायललाच पूर्णपणे जबाबदार धरले. ‘हार्वर्ड अंडरग्रेजुएट पॅलेस्टाईन सॉलिडॅरिटी कमिटी’ ही 30 हून अधिक विद्यार्थी गटांची एक छत्री संघटना आहे. गाझापट्टीतील हिंसाचाराला केवळ इस्रायलची वर्णभेदी राजवटच दोषी आहे, असे या संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर संबधित विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तर एका फॅकल्टी सदस्याची ज्यू विद्यार्थ्यांना वसाहतवादी म्हणेपर्यंत मजल गेली आणि दुसरीकडे हमासने इस्रायली नागरिकांच्या केलेल्या क्रूर कत्तलीविषयी मात्र या प्राध्यापक महोदयांनी तोंडातून ‘ब्र’ देखील काढला नाही. अमेरिकेतील काही वृत्तपत्रात प्रकाशित बातम्यांनुसार, एका प्राध्यापकाने ज्यू विद्यार्थ्यांना हात वर करण्यास सांगितले, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याजवळील वस्तूंपासून वेगळे करण्यात आले आणि ते म्हणाले की ज्यू पॅलेस्टिनी लोकांसोबत काय करीत आहेत याचे अनुकरण आम्ही करीत आहोत.
 
 
पॅलेस्टिनी समर्थक रॅलीत सहभाग
कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्टले येथे, विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये पॅलेस्टिनी समर्थक रॅलीत सहभागी होण्यासाठी ‘अतिरिक्त क्रेडिट’ ची ऑफर देण्यात आली. ‘युद्ध आणि मृत्यूची जबाबदारी इस्रायलवर आहे,’ असे कोलंबिया विद्यापीठातील पॅलेस्टाईन सॉलिडॅरिटी ग्रुप्सच्या संयुक्त निवेदनात घोषित करण्यात आले आहे.
 
 
Jewish people : येल विद्यापीठातील ‘येल डेली न्यूज’ हे अमेरिकेतील सर्वांत जुने महाविद्यालयीन दैनिक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रात इस्रायल समर्थक स्तंभ लिहिण्यात येतो. हमासच्या इस्रायसमधील नरसंहारानंतर ‘येल डेली न्यूज’ मध्ये प्रकाशित स्तंभात ‘हमासच्या दहशतवाद्यांनी यहूदी/ज्यू महिलांवर बलात्कार केला आणि पुरुषांचा शिरच्छेद केला’ असा स्पष्ट उल्लेख केला होता. मात्र, वृत्तपत्राच्या संपादकांना आणि अभिव्यक्ती व विचारस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्‍या लोकांना हे परखड व सत्य विधान आवडले नसावे. या वृत्तपत्राचे मुख्य संपादक टार्टक यांनी संपादकीय खुलासा प्रसिद्ध केला आणि स्तंभात हमासविषयी केलेली ‘अप्रमाणित टिपणी’ काढून टाकत असल्याचे सांगितले. एवढ्या जुन्या व प्रतिष्ठित वर्तमानपत्रालाही हमासच्या दहशतवादी व क्रूर कृत्यांचा उघडउघड निषेध करण्याची हिंमत झाली नाही. म्हणजेच इस्लामी दहशतवादी व त्यांना पाठिंबा दर्शविणार्‍यांचा निषेध करण्याचीही हिंमत अमेरिकेतील लोकशाहीवादी वृत्तपत्रांना होऊ नये, ही अतिशय आश्चर्याची व चिंतेची बाब आहे. एवढेच नव्हे तर हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या संपादकाने इस्रायलविरोधी रॅलीदरम्यान कॅम्पसमध्ये एका ज्यू विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
 
 
दुटप्पी मापदंड उघड
Jewish people :  इस्रायलवर हमासने केलेल्या भयंकर हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर अमेरिकेतील शैक्षणिक कॅम्पसमध्ये सर्रासपणे यहूदीविरोधी भावना व अभिव्यक्ती स्वातत्र्यांच्या उल्लंघनामुळे अभूतपूर्व निषेध आंदोलनास गती मिळाली आहे. मात्र, या कॅम्पसमध्ये काही विशिष्ट विचारांच्या लोकांचा प्रभाव निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी विशेषत: जे कृष्णवर्णीय, मुस्लिम, एलजीबीटीक्यू+ किंवा तत्सम ‘प्राधान्य’ गटांशी संबंधित नाहीत, त्यांना अधिकाधिक असुरक्षित वाटू लागले आहे आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहे. या काही वर्षांमध्ये आणि असंख्य घटनांद्वारे, या शीर्ष विद्यापीठांनी द्वेष आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हाताळण्यात उघडपणे दुटप्पी मापदंड प्रदर्शित केली आहेत. विद्यार्थ्यांना राजकीय भाषणासाठी शिक्षा केली जाऊ शकत नाही, हे क्लॉडिन यांचे विधान तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. परंतु जेव्हा हार्वर्ड आणि इतरांकडे शैक्षणिक स्वातंत्र्य, संस्थात्मक तटस्थता आणि दृष्टिकोनाच्या विविधतेबद्दल कोणतीही पूर्व विश्वासार्ह बांधिलकी नसते, तेव्हा तत्त्वासाठी पुन्हा केलेले आवाहन आक्षेपार्ह आहे, असे दोषी दिसते, असे हार्वर्डमधील प्राध्यापक पिंकर स्टीव्हन यांनी म्हटले आहे.
 
 
काही भारतीय आणि भारतीय अमेरिकन लोकांसह डाव्या विचारसरणीचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या दबावाखाली पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाषण करण्यास मनाई केली होती. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी एकत्र येऊन हिंदू धर्माचे सार असलेल्या ‘हिंदुत्व’ विरोधात एक परिषद आयोजित केली होती. ‘डिसमंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे लेबल असलेल्या या परिषदेत हिंदू, हिंदुत्व, हिंदू धर्म यांच्या विरोधातील घोषणा, नारे ही नरसंहाराची वैशिष्ट्ये होती.
 
 
Jewish people : अनेक दशकांपासून अमेरिकेतील विद्यापीठांनी विविधता, समानता आणि समावेशन (डीईआय) वंश, लैंगिक अभिमुखता, धर्म इत्यादींच्या तुलनेत गुणवत्तेला कमी महत्त्व दिले आहे. अनेक महाविद्यालयांनी प्रमाणित चाचण्या म्हणजेच वस्तुनिष्ठ निकष संपुष्टात आणले आहेत. त्याऐवजी वंश, धर्म, व ओळख संबंधी अन्य निकष प्रवेशासाठी लावले आहेत. याचा फायदा घेत निरंकुश डीईआय नोकरशाहांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली व्याप्ती आणि क्षेत्र वाढवले. हार्वर्ड विद्यापीठाने काही अर्जदारांना इतरांपेक्षा अधिक पसंती देण्यासाठी नियमबाह्य अर्थात जातीय व वांशिक निकष राबविले. यात प्रामुख्याने आशियाई अमेरिकन, भारतीयांचा समावेश आहे. हार्वर्डवर सकारात्मक कृती-आधारित वांशिक भेदभावासाठी खटला भरण्यात आला. स्टुडंट्स फॉर फेअर अ‍ॅडमिशन्स विरुद्ध हार्वर्ड कॉलेज प्रकरणात, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात, विद्यापीठाच्या प्रवेशांमध्ये जात, वंश याचा विचार करणे घटनाबाह्य ठरले. या सार्‍या उद्वेगजनक प्रकाराबद्दल वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये सांता क्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक एमेरिटस जॉन एलिस आपल्या एका लेखात लिहितात, एकेकाळी आपल्या प्रगत समाजाचा एक अपरिहार्य आधार असलेली शिक्षण केंद्रे, शैक्षणिक क्षेत्र आता कर्करोग बनले आहे. ‘कट्टरपंथी डावे व त्यांची झुंडशाही हे याचे प्रमुख कारण आहे. अमेरिकन पदवीधर तरुणांची संपूर्ण पिढी त्यांच्या कल्पनांसह प्रेरित झाली आहे. एक समाज म्हणून, आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांवर डाव्या विचारसरणीच्या कट्टरपंथीयांचे वर्चस्व वाढू देऊ नये. आपण आपल्या संस्था त्यांच्या तावडीतून सोडविल्या पाहिजेत अर्थात त्यांचे वैचारिक वर्चस्व संपुष्टात आणले पाहिजे व त्यांना त्यांच्या मूळ मूल्यांमध्ये पुन्हा समर्पित केले पाहिजे’, असेही प्रा. एमेरिटस एलिस यांनी स्पष्टपणे लिहिले आहे. 
 
- (ऑर्गनायझरवरून साभार)