सेंगोलचा वाद कशासाठी? काय सांगतो राजदंड?

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
विश्लेषण
- मनोज कुमार श्रीवास्तव
Sengol : 1947 मध्ये सत्तेचे हस्तांतरण झाले होते आणि तेव्हाच हा सेंगोल (राजदंड) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना प्राप्त झाला होता. नंतर तो संग्रहालयात स्थापित करण्यात आला,
 
 
Sengol-1
 
Sengol : चोल साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं साम्राज्य होतं. नवव्या शतकात चोल साम्राज्याचा उदय झाला. पुढे तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य आता अस्तित्वात असलेल्या 11 देशांमध्ये पोहोचलं होतं. दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापूर आणि मालदीव इतक्या सगळ्या देशांमध्ये चोल साम्राज्याची पताका फडकत होती. अर्थात तेव्हा यातल्या अनेक देशांची नाव वेगळी होती. इथं चार शतकांपेक्षा जास्त काळ चोल साम्राज्याचीच सत्ता होती आणि याच चोल साम्राज्याच्या इतिहासातून चक्रवर्ती राजगोपालचारी यांना सेंगोलचे रहस्य उलगडले. दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्यात नव्या राजाची निवड होत असताना, पद सोडणारा राजा आपल्या हाताने सेंगोल म्हणजेच राजदंड पुढच्या राजाच्या हातात देतो आणि अशाच पद्धतीनं चोल साम्राज्यात शतकानुशतकं सत्तेचं हस्तांतर होत होतं.
 
 
सेंगोल म्हणजे नेमकं काय?
Sengol ‘सेंगोल’ हा शब्द तामिळ शब्द ‘सेम्माई’ वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा आहे. तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठातील मुख्य मठाधीपती यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं जातं. न्यायाचा रक्षक म्हणून त्यावर हाताने कोरलेला नंदी बसवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल धारण करणार्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्याने विसरू नये असे निर्देश असतात.
 
 
सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा होती आणि त्याचं सेंगोलच्या हस्तांतरानं चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतर व्हायचं. हीच संकल्पना चक्रवर्ती राजगोपालचारींनी पंडित नेहरूंना सांगितली. एवढेच नव्हे तर सत्तेचे हस्तांतर होत असताना यापेक्षा चांगलं प्रतीक मिळणार नाही असेही त्यांच्या लक्षात आणून दिले.
 
 
Sengol सेंगोल हे न्याय, सत्ता हस्तांतरण आणि सुशासनाचे प्रतीक मानले जाते. हे ब्रिटिश सरकारकडून भारतात सत्तेचे हस्तांतरण म्हणून चिन्हांकित करण्यात आले होते. राजदंड हा भारताच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून देणारा आहे. सेंगोल ज्यांना मिळतो त्यांना निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासन करणे अभिप्रेत असते. हा राजदंड चोल साम्राज्याशी निगडीत आहे. तामिळनाडूच्या पुजार्‍यांकडून यावर धार्मिक प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 1947 नंतर भारतीय सत्राधार्‍यांना राजदंडाचा विसर पडला होता. 1971 मध्ये तामिळनाडूच्या विद्वानांनी हा राजदंड पुन्हा चर्चेत आणला. तर 2021-22 मध्ये भारत सरकारने याविषयी माहिती संकलित केली होती.
 
 
Sengol : सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा होती आणि त्याच सेंगोलच्या हस्तांतराने चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतरण व्हायचे. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी सांगितलेली संकल्पना पंडित नेहरूंनाही आवडली आणि त्यांनी होकार दिला. त्यावेळी राजगोपालचारींनी एक समिती स्थापन केली. त्यामध्ये दक्षिणेतील काही महंताचा समावेश केला. राजगोपालचारींनी तामिळनाडूंच्या महंतांना आपला हेतू सांगितला. तेव्हाच्या मठाधीशांनीही राजगोपालचारींच्या विनंती होकार केला आणि 1947 साली वुम्मिदी बंगारू ज्वेलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती केली. या राजदंडावर नंदीची मूर्तीही स्थापित केली. हाच राजदंड पुढे दिल्लीत पोहोचला आणि त्याची विधीवत पूजा करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी हाच राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातात दिला. अशा प्रकारे देशातल्या ब्रिटिश सत्तेचे हस्तांतर भारतीयांकडे झाले. आता हाच राजदंड नवीन संसदेत स्थापित करण्यात आला आहे.
 
 
सत्तांतरणाच्या या प्रतीकाला पुन्हा मानाच्या, गौरवाच्या स्थानी अधिष्ठित करण्यात येत आहे. जग सपाट नाही, ते गोल आहे आणि शेवटी तेथेच परतते जिथे त्याला परतायचे होते. सत्तेचे चक्र नेहमी बदलत राहते. ते एकाकडून दुसर्‍याकडे हस्तांतरित होत राहते. गीतेच्या ज्ञानांतरणाची एक परंपरा आहे, तसेच सेंगोलचेही आहे. गीतेचे ज्ञान हस्तांतरित करण्याची जशी परंपरा आहे, तशीच सत्ता हस्तांतरणाचीही परंपरा आहे. आज मी सत्तासिंहासनावर आहे काल तिथे दुसरा कोणीतरी होता. हाही एक टप्पा आहे, तोही एक टप्पा होता. महाभारतातील शांतिपर्वातील राजधर्मानुशासनपर्वात सर्वात प्रथम शिव हा राजदंड विष्णूला देतो.
 
महादेवस्ततस्तस्मिन् वृत्ते यज्ञे यथाविधी ।
जा दंडन धर्मस्य गोप्तारं विष्णवे सत्कृतं ददौ ॥
त्यानंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा यज्ञ विधीपूर्वक संपन्न झाला तेव्हा भगवान महादेवाने धर्मरक्षक भगवान विष्णूंचा सन्मान करून त्यांना तो दंड समर्पित केला.
 
विष्णुरिरसे प्रादादिरामुनिसत्तम: ।
प्रादादिन्द्रमरीचिभ्यां मरीचिर्भृगवे ददौ ॥
भगवान विष्णूने तो अंगिराला दिले. अंगिरा ऋषींनी तो इंद्र आणि मरीचिला दिला आणि अखेर मरीचिने तो राजदंड भृगुच्या स्वाधीन केला.
 
भृगुरदादवृषिभ्यस्तु दंडं धर्मसमाहितम्।
ऋषयो लोकापलेभ्यो लोकपालः क्षुपया च ॥
क्षुपस्तु मानवे प्रदादित्यतनया च । पुत्रेभ्यः श्रद्धादेवस्तु सूक्ष्मधर्मार्थकारणात ।
भृगुने तो धर्मसमाहित दंड ऋषींना प्रदान केला. ऋषींनी तो लोकपालांच्या स्वाधीन केला, लोकपालांनी तो क्षुपाकडे, क्षुपाने तो सूर्यपुत्र मनू (श्राद्धदेव) यांच्या सुपूर्द केला आणि श्राद्धदेवाने सूक्ष्म धर्म आणि अर्थ यांच्या रक्षणासाठी तो राज्य व धर्मदंड आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केला.
 
विभज्य दण्ड: कर्तव्यो धर्मेण न यदृच्छया॥
दुष्टानां निग्रहो दंण्डो हिरण्यं बाह्यत: क्रिया॥
त्यामुळे धर्मानुसार न्याय आणि अन्यायाचा विचार करूनच दंड, शिक्षेचा निर्णय घ्यावा आणि मनमानी करू नये. दंड करण्याचा मुख्य उद्देश दुष्टांचे निर्दालन करणे हाच आहे, सोन्याच्या नाण्यांनी तिजोरी भरणे हा नाही. दंड म्हणून सुवर्ण (धन) घेणे हे तर बाह्य आणि गौण (दुय्यम) कर्म आहे.
 
व्यत्वं व शरीरस्य वधो नाल्पस्य कारणात् ।
शरीरपीडास्तास्ताश्च देहत्यागो विवासनम् ॥
एखाद्या लहानशा, क्षुल्लक अपराधाबद्दल गुन्हेगाराच्या शरीराचे अंग कापणे, विटंबना करणे, त्याला ठार मारणे, छळ करणे त्याला विविध प्रकारे यातना देणे आणि प्राण अर्पण करण्यास भाग पाडणे किंवा देशाबाहेर घालवणे हे कधीही योग्य नाही.
 
तं ददौ सूर्यपुत्रस्तु मनुर्वै रक्षणार्थकम्
आनुपूर्व्याच्च दण्डोऽयं प्रजा जागर्ति पालयन् ॥
सूर्यपुत्र मनूने प्रजेच्या रक्षणासाठीच आपल्या पुत्रांच्या हाती हा दंड सोपविला होता. तोच क्रमश: उत्तरोत्तर अधिकार्‍यांच्या हाती येऊन प्रजेचे पालन करीत सदैव जागा, दक्ष असतो.
 
इन्द्रो जागर्ति भगवानिन्द्रादग्निर्विभावसुः ।
अग्नेर्जागर्ति वरुणो वरुणाच्च प्रजापतिः ॥
भगवान इंद्र दंडविधान करण्यात नेहमी सतर्क असतात. इंद्राकडून आलेला प्रकाश म्हणजे अग्नी, अग्नीपासून वरुण आहे आणि वरुणपासून प्रजापतीला हा धर्मदंड प्राप्त होतो आणि ते त्याचा योग्य वापर करण्यासाठी सदैव दक्ष असतात.
 
प्रजापतेस्ततो धर्मो जागर्ति विनयात्मकः ।
धर्माच्च ब्रह्मणः पुत्रो व्यवसायः सनातनः॥
जे संपूर्ण जगाला दंड देणारे आहे, ते धर्म प्रजापतीकडून धर्मदंड ग्रहण करून लोकांच्या रक्षणासाठी सदैव दक्ष असतात. ब्रह्मपुत्र सनातन व्यवसायापासून शिक्षेपर्यंत लोकरक्षेसाठी सदैव जागृत व सतर्क असतात.
 
व्यवसायात् ततस्तेजो जागर्ति परिपालयत् ।
ओषध्यस्तेजसस्तस्मादोषधीभ्यश्च पर्वताः ॥
पर्वतेभ्यश्च जागर्ति रसो रसगुणात् तथा ।
जागर्ति निरृतिर्देवी ज्योतींषि निर्ऋतेरपि ॥
व्यवसायातून दंड घेऊन तेजस्वी विश्वाचे रक्षण करीत सजग, सावध राहतो. अग्नीपासून औषधी, औषधांतून पर्वत, पर्वतांतून रस, रसातून निर्ऋति आणि निर्ऋति पासून ज्योती अनुक्रमे तो दंड हस्तगत करून लोकांच्या रक्षणासाठी दक्ष राहतात.
 
वेदा: प्रतिष्ठा ज्योतिर्थ्यस्ततो हयशिराः प्रभुः ।
ब्रह्मा पितामहस्तस्माज्जागर्ति प्रभुरव्ययः ॥
ज्योतींपासून दण्ड ग्रहण करून वेद प्रतिष्ठित झाले आहेत. वेदांतून भगवान हयग्रीव आणि हयग्रीवापासून अविनाशी भगवान ब्रह्मदेव तो दंड ग्रहण करून लोकांच्या रक्षणासाठी सदैव जागृत राहतात.
 
पितामहान्महादेवो जागर्ति भगवान् शिवः ॥
विश्वेदेवाः शिवाच्चापि विश्वेभ्यश्च तथर्षयः ॥ ॥
ऋषिभ्यो भगवान् सोमः सोमाद् देवाः सनातनाः । ।
देवेभ्यो ब्राह्मण लोके जाग्रतीत्युपधारय ॥
पितामह ब्रह्मदेवाकडून दंड आणि संरक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर महान भगवान भगवान शिव जागृत होतात. शिवापासून विश्वदेव, विश्वदेवातून ऋषी, ऋषींपासून भगवान सोम, सोममधून सनातन देवगण आणि देवतांकडून ब्राह्मण तो अधिकार घेऊन लोकरक्षणासाठी सदैव सतर्क राहतात. हे तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे.
 
प्रजा जागर्ति लोकेऽस्मिन् दण्डो जागर्ति तासु च ।
सर्वं संक्षिपते दण्डः पितामहसमप्रभः ॥
या जगात प्रजा जागृत आहे आणि प्रजेत दंड जागृत आहे. तो भगवान ब्रह्मदेवाप्रमाणे तेजस्वी दंड सर्वांना मर्यादेत ठेवतो.
 
जागर्ति कालः पूर्वं च मध्ये चान्ते च भारत ।
ईश्वरः सर्वलोकस्य महादेवः प्रजापतिः ॥
हे भारत! हा कळरूप दंड सृष्टीच्या आरंभी, मध्यात आणि शेवटी जागृत राहतो. हा धर्मदंड सर्व-लोकेश्वर महादेवाचेच स्रूप आहे. तो सर्व प्रजेचा रक्षक आहे.
त्यामुळे दंडाचे हे हस्तांतरण (ट्रान्सफेरिबिलिटी) तर लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या की तुमच्या आधीही इथे कोणीतरी सत्तांध होता. आपणच देव-प्रतिपरमेश्वर असल्याचा त्याचा विश्वास होता. मात्र, धर्मदंड हा राजाला आपल्या कर्तव्याची, राजधर्माची आठवण करून देतो की सत्ता निरंकुश नाही. त्यावर धर्माचा, न्यायाचा, नीतीचा अंकुश आहे. सेंगोल अर्थात राजदंड हे याचेच प्रतीक आहे. हा एक महान परंपरेचा भाग आहे आणि त्याच्या निरंतरतेचा पुरावा देखील आहे. हा दंड राजधर्माला अनुशासनात ठेवण्यासाठी आहे. म्हणून या पर्वाचे नाव राजधर्मानुशासन आहे. येथे दंडशक्ती प्रजेजवळ देखील आहे. तर हा परस्पर मर्यादेचा चेक आणि बॅलन्सचा खेळ आहे. महाभारताच्या या दंड प्रसंगात आपल्याला जी गोष्ट आकर्षित करते ती म्हणजे जागरूकता. (awareness).. काहीतरी निश्चित उद्दिष्ट असल्याशिवाय यावर एवढा भर दिला जाणे शक्य नाही. या लोकशाहीसाठी ही गोष्ट खूपच प्रेरक आहे की
 
प्रजा जागर्ति लोकेऽस्मिन् दण्डो जागर्ति तासु च ।
सर्वं संक्षिपते दण्डः पितामहसमप्रभः॥ असे आपल्या या प्राचीन ग्रंथान म्हटले आहे. अर्थात या जगात प्रजा जागृत आहे आणि Sengol : प्रजेमध्ये दंड जागृत आहे. तो ब्रह्मदेवाप्रमाणे तेजस्वी दंड सर्वांना आपल्या मर्यादेत ठेवतो.
तर हा दंड राजधर्माला अनुशासनात ठेवण्यासाठी आहे. म्हणून या पर्वाचे नाव राजधर्मानुशासन आहे. इथे लोकांजवळ दंड देण्याचीही शक्ती आहे. प्रजेची जागरूकता eternal vigilance is the price of democracy, if not of liberty. ही लोकशाही जी शिक्षेच्या भारतीय संकल्पनेत आहे ती राजेशाहीपेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे.तिरुक्कुरलमधील सेनकोनमाई अध्यायात, कवी तिरुवल्लुवर यांनी या सेंगोलला विज्ञान आणि धार्मिकता, वेद आणि त्यातील गुणांचा आधार म्हटले आहे.
 
 
विद्वान जे काही लिहितात आणि ते ज्या गुणांना महत्त्व देतात याचे मूळ ते सेंगोल आहे. तिरुक्कुरलच्या मते, जसे जग पावसासाठी आकाशाकडे पाहते, त्याचप्रमाणे लोक न्यायासाठी सेंगोलकडे पाहतात.
सेंगोल राजा आणि धर्म यांच्यातील संवादाचे प्रतीक आहे. सेंगोलच्या शीर्षस्थानी एक वृषभ अर्थात बैल आहे. जयशंकर प्रसाद यांनीही वृषभ हा धर्माचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. यामागील शास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी स्पष्ट केला. धर्म साक्षी आहे आणि सेंगोल राज्यकर्त्यांवर सतत लक्ष ठेवून आहे. सेंगोल ही आग्रह आहे, संग्रह नाही. राज्यकारभाराचे पावित्र्य राखणारा हा धर्म व न्यायदंड आहे. त्यामुळेच हा सेंगोल अर्थात राजदंड, धर्मदंड लोकशाहीचा जणू आधारस्तंभ आहे.

त्यामुळे दंडाचे हे हस्तांतरण (ट्रान्सफेरिबिलिटी) तर लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या की तुमच्या आधीही इथे कोणीतरी सत्तांध होता. आपणच देव-प्रतिपरमेश्वर असल्याचा त्याचा विश्वास होता. मात्र, धर्मदंड हा राजाला आपल्या कर्तव्याची, राजधर्माची आठवण करून देतो की सत्ता निरंकुश नाही. त्यावर धर्माचा, न्यायाचा, नीतीचा अंकुश आहे. Sengol सेंगोल अर्थात राजदंड हे याचेच प्रतीक आहे. हा एक महान परंपरेचा भाग आहे आणि त्याच्या निरंतरतेचा पुरावा देखील आहे. हा दंड राजधर्माला अनुशासनात ठेवण्यासाठी आहे. म्हणून या पर्वाचे नाव राजधर्मानुशासन आहे. येथे दंडशक्ती प्रजेजवळ देखील आहे. तर हा परस्पर मर्यादेचा चेक आणि बॅलन्सचा खेळ आहे. महाभारताच्या या दंड प्रसंगात आपल्याला जी गोष्ट आकर्षित करते ती म्हणजे जागरूकता. (awareness) काहीतरी निश्चित उद्दिष्ट असल्याशिवाय यावर एवढा भर दिला जाणे शक्य नाही.
- (लेखक मध्यप्रदेश सरकारचे माजी अपर मुख्य सचिव आहेत.)
(पांचजन्यवरून साभार)