नागपूर,
Tembe Swami Maharaj आषाढ शुद्ध प्रतिपदा ,श्री दत्तावतारी परिव्राजकाचर्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची एकशे दहावी पुण्यतिथी आहे .१९१४ मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदेला नर्मदा तटावर गरुडेश्वर येथे स्वामींनी योग मार्गाने देहत्याग केला. आज महाराष्ट्रात इतर प्रांता पेक्षा जास्त दत्तभक्त आहे .गुरुचरित्राचे पारायण करणारे भाविक आहेत. त्याचे कारण स्वामीजींनी दत्तभक्तीचा मार्ग समाजाला दाखवला. यावर्षी बुधवार दिनांक ३ जुलै ते शनिवार ६/७/२४ या कालावधीत महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला गेल्या ७१ वर्षापासून बुटी मंदिरात स्वामींची पुण्यतिथी साजरी होते.
यंदाचा उत्सव गोपाळ कृष्ण मंदिर गोरक्षण सभा वर्धा रोड येथे मोठ्या उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.Tembe Swami Maharaj आज यती आराधना आचार्य वेदशास्त्र संपन्न श्री कृष्णा शास्त्री आर्वीकर यांच्या अध्यक्षतेत पार पडला. सर्व दत्त भक्तांनी प्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य :अभय चोरघडे,संपर्क मित्र