!!गार्डन क्लबतर्फे ब्रह्मकुमारी आश्रमात वृक्षारोपण!!

    दिनांक :07-Jul-2024
Total Views |
नागपूर,
Garden Club संत नगर येथील ब्रह्मकुमारी आश्रमात नागपूर गार्डन क्लब सिविल लाइन्स तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यात प्रामुख्याने नागपूरला संत्रा नगरी करण्याच्या उद्देशाने संत्र्याच्या, तसेच पेरू, चिकू व सीताफळांच्या झाडांचा समावेश होता.हा कार्यक्रम नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा अनुजा परचूरे यांच्या पुढाकाराने पार पडला.यावेळी त्या म्हणाल्या,दिवसेंदिवस शहरीकरणामुळे नागपूरचे हरित वलय कमी होत आहे. ते वाढवण्याच्या दृष्टीने तसेच जमिनीचा कस टिकून राहण्याच्या दृष्टीने संत्र्यासारखे दुसरे उपयुक्त झाड नाही. त्यामुळे नागपूरला संत्रा नगरी हा जुना दर्जा परत मिळवून देण्यासाठी व नागपूरचे हरित वलय कायम राखण्यासाठी असे वृक्षारोपणाचे कार्यक्रम येणाऱ्या पुढील काळात भरपूर प्रमाणात घेण्यात येतील.
 
21 
 या कार्यक्रमासाठी झाडांची रोपे नागपूर गार्डन क्लबच्या सदस्या रेखा देशमुख यांनी उपलब्ध केली. कार्यक्रम झाल्यावर ब्रह्मकुमारी आश्रमाच्या रजनीजी यांनी उद्बबोधनपर भाषण केले.Garden Club त्यात त्यांनी झाडांवर संगीताचा तसेच वातावरण यावर होणारा परिणाम सांगितला. झाडांमुळे मनुष्याला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव कसा येऊ शकतो व त्यामुळे आपले आयुष्य कसे आनंदी आणि सुखकर होऊ शकते हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागपूर गार्डन क्लब संस्थेतर्फे रेखा देशमुख, उपध्यक्ष्या सुनीता शर्मा , आरती राजकोंडावार, कोषाध्यक्ष नितीन दाते, समित आदमने, डॉ पाठक, रेखा खैरनार, सुनीता साळवे तसेच ब्रह्मकुमारी आश्रमातर्फे तेथील बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.
सौजन्य,नितीन दाते,संपर्क मित्र