पंढरपूर आषाढी एकादशीकरिता 4 विशेष गाड्या

    दिनांक :07-Jul-2024
Total Views |
नागपूर,
Pandharpur Ashadhi Ekadashi special trains : रेल्वेतील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे नागपूर-मिरज-नागपूर दरम्यान 4 पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवणार आहे. यात प्रामुख्याने नागपूर-मिरज स्पेशल (2 सेवा) राहणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 01205 विशेष नागपूर 14.07.2024 रोजी 08.50 वाजता सुटेल आणि आणि दुसर्‍या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचणार आहे. तर ट्रेन क्रमांक 01206 विशेष 18.07.2024 रोजी मिरजहून 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
 
 
Pandharpur  trains
 
या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे, आरग असे थांबे देण्यात आले आहे. यात एक - 3 टियर, 8 स्लीपर क्लास, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन आहे.
 
 
Pandharpur Ashadhi Ekadashi special trains : नागपूर-मिरज स्पेशल (2 सेवा) या गाडीचा क्रमांक 01207 असून ही विशेष नागपूरहून 15.07.2024 रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक 01208 विशेष 19.07.2024 रोजी मिरजहून 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचणार आहे.