16 वर्षांपूर्वीच्या आंदोलन खटल्यात राज ठाकरे निर्दोष

    दिनांक :07-Jul-2024
Total Views |
- इस्लामपूर न्यायालयाचा निर्णय
 
सांगली, 
मराठीच्या मुद्यावर 16 वर्षांपूर्वी शिराळा येथे झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात न्यायालयाने मनसेचे प्रमुख Raj Thackeray राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतचा निर्णय इस्लामपूर न्यायालयाने दिला. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे 2008 मध्ये झालेल्या मनसेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
 
 
Raj Thackeray
 
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर Raj Thackeray राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. 2007 मध्ये स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्यावरून रान पेटवले होते. 2008 मध्ये रेल्वे भरतीत मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्यावरून मनसेने मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी सांगली जिल्ह्याच्या शिराळ्यात 2008 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला. येथील रेल्वे भरती प्रकरणी मराठी मुद्यावरून मनसेने केलेल्या आंदोलनातील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.