साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :07-Jul-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य
 
 
Saptahik Rashbhavishya

मेष (Aries) : दबदबा निर्माण होईल
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या सुखस्थानातून सुरू होत आहे. त्याचा शुभ प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रावर दिसून येऊ शकतो. त्यामुळे सामान्यपणे आठवड्याच्या पूर्वार्धात सारी कामे आपल्या मनाप्रमाणे होताना दिसू शकतील. सहकार्‍यांची चांगली साथ मिळेल. विरोधकांच्या कारवायांना खीळ घालता येईल. नोकरीत, व्यवसायात, कुटुंबात तसेच काहींना राजकारण व समाजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करता येईल. काही चांगल्या संधी उपलब्ध होतील. अपेक्षित यश मिळविण्यासाठी कोणतीही संधी सोडू नये. शुभ दिनांक - 8, 9, 10, 11.
 
  
वृषभ (Taurus) : गाफील राहणे धोक्याचे
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पराक्रम स्थानातून सुरू होत आहे. त्याची भाग्य स्थानावर शुभ दृष्टी येत आहे. मात्र त्यामुळेच सुलभतेच्या प्रभावाखाली राहू नये. कारण कोणत्याही गाफील क्षणी आपली फसगत होण्याची संभावना आहे. मित्रवर्ग आणि कुटुंबीय आपल्या बाजूने भक्कमपणे उपस्थित राहतील. त्यामुळे आपली आर्थिक बाजू या सार्‍या ओढाताणीतही सुरक्षित राहील. विपरीत परिस्थितीतील तणाव हलका करण्यास ते सहाय्यभूत ठरतील. संततीकडून आनंददायक बातम्या मिळू शकतील. त्यांना नोकरी-व्यवसायाच्या संबंधाने चांगले योग यावेत.
शुभ दिनांक - 10, 11, 12, 13.
 
 
मिथुन (Gemini) : आर्थिक कामांना वेग
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील धन स्थानातून सुरू होत आहे. त्याचवेळी आपला राशिस्वामी बुध चंद्रासोबत धनस्थानीच आहे. हा आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम योग आहे. आपली आर्थिक कामी वेग घेऊ शकतील. तरी सारी कामे अगदी सहज सोपी घडणार नाहीत हेही खरे. याच योगाच्या प्रभावाने वरिष्ठ अधिकारी वर्ग नाराजीचा सूर काढताना दिसतील. याचा आपले विरोधक व स्पर्धक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. हाती येणार्‍या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. दरम्यान, काहींना प्रकृतीची कुरबूर, दगदग निर्माण होण्याची संभावना आहे. शुभ दिनांक - 9, 11, 12, 13.
 
 
कर्क (Cancer) : उत्तम लाभकारक योग
या आठवड्यात आपला राशिस्वामी चंद्राचे भ्रमण कुंडलीतील स्वतःच्याच राशिस्थानातून सुरू होत आहे. शिवाय तेथे त्याला लाभेश शुक्राची जोड मिळत आहे. या योगाच्या प्रभावामुळे या आठवड्यात आपणास आर्थिकदृष्ट्या उत्तम लाभकारक योग यावेत. कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठीही उत्तम स्थिती राहील. आपल्या कलेचे कौतूक होईल. काहींना मानसन्मान प्राप्त होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अधिकारपद लाभणे, आर्थिक लाभ मिळणे, अधिकार्‍यांची मर्जी संपादन करता येणे, व्यवसाय विस्ताराच्या योजना आकारात येणे या सप्ताहात संभव आहे. शुभ दिनांक - 8, 9, 12, 13.
 
 
सिंह (Leo) : कुटुंबात गैरसमज टाळा
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील व्यय स्थानातून सुरू होत आहे तर राशिस्वामी रवी लाभस्थानात विराजमान आहे. या संमिश्र स्वरूपाच्या योगामुळे आपल्याला अपेक्षित लाभ पदरी पाडून घेण्यासाठी संघर्ष करण्याची शारीरिक, मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे. कुटुंबात गैरसमजाचे, संघर्षाचे व परस्परांत कटुता निर्माण करणारे वातावरण निर्माण होऊ शकते. आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही, बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र आपणास काहीसा दिलासा मिळू शकेल.
शुभ दिनांक - 8, 9, 11, 12.
 
 
कन्या (Virgo) : उत्साही-आनंदी वातावरण
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत असतानात राशिस्वामी बुध चंद्रासोबत लाभस्थानातच आहे. या योगामुळे आपणास अतिशय उत्साही व आनंदी वातावरण लाभणार आहे. शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील नोकरी-व्यवसायातील कामकाजात यश मिळू शकेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना उत्तम यश, चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे असे सुखद अनुभव मिळतील. व्यवसायात काही मोठे आर्थिक व्यवहार होऊ शकतात. या सप्ताहात काही विवाहेच्छू युवकांचे व युवतींचे विवाह जमण्याच्या हालचालींना वेग येऊ शकतो. शुभ दिनांक - 10, 11, 12, 13.
 
 
तूळ (Libra) : कार्यक्षेत्रात चांगल्या संधी
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या दशम स्थानातून राशिस्वामी शुक्राच्या साहचर्याने सुरू होत आहे. हे प्रथम दर्जाचे कर्मस्थान आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसायात असलेल्या मंडळींना उत्तम योग लाभावेत तसेच नोकरीच्या शोधात असणार्‍यांना चांगल्या संधी लाभून अर्थार्जन सुरू करता येईल. व्यवसायात नव्या क्षेत्रात पाऊल टाकावयास हरकत नाही. भागीदारीत असलेल्यांनी मात्र सावध असावे. त्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. ते सामोपचाराने व चातुर्याने मिटविता येऊन व्यवसायात पुढे जाता येऊ शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात काहींना आरोग्याच्या कुरबुरी निर्माण होऊ शकतात.
शुभ दिनांक - 8, 10, 12, 13.
 
 
वृश्चिक (Scorpio) : नोकरी-व्यवसायात उत्तम यश
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील भाग्य स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी मंगळ सहाव्या व सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे. सर्वसाधारणपणे राशिस्वामीची स्थिती आपणास नोकरी-व्यवसायात उत्तम यश देऊ शकते. या क्षेत्रात काही चांगल्या संधी चालून येतील. विरोधकांवर विजय मिळविता येईल. अधिकार्‍यांची मर्जी संपादन करता येईल. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग वाढू शकतो. यामुळे आपली प्रतिष्ठा व सहकार्‍यांमधील वजन वाढेल. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या संधी लाभू शकतील. शुभ दिनांक - 8, 9, 10, 12.
 
 
धनु (Sagittarius) : सतर्कता बाळगणे आवश्यक
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पीडादायक अष्टम स्थानातून सुरू होत आहे. राशीचा स्वामी गुरू अनारोग्याच्या स्थानात मुक्कामी आहे. यामुळे हा सप्ताह काहीसा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात विविध भानगडी व दुसरीकडे अनारोग्याच्या तक्रारींची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी, व्यवसाय व कुटुंबात आपल्या व्यवहारामुळे वितुष्ट येणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. स्वतःच्याच चुका व गाफीलपणा भोवणार असल्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. काहींना घर व कुटुंबापासून दूर जावे लागू शकते.
शुभ दिनांक - 8, 10, 11, 12.
 
 
मकर (Capricorn) : विपरीत स्थितीतही यश
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या सप्तम स्थानातून सुरू होत आहे, त्याचवेळी राशिस्वामी शनी धनस्थानात आहे. सध्या साडेसातीचा शेवटचा व बराचसा सुलभ काळ देणारा टप्पा आपणास सुरू आहे. आपला उत्साह व जिद्द टिकवून ठेवण्यासाठी मदत लाभेल. त्यामुळे आपण स्वकष्टाने, प्रयत्नपूर्वक चांगल्या संधी व भाग्योदयाचे क्षण पदरी पाडून घेऊ शकाल. विपरीत स्थितीतही यशाची एक एक पायरी पुढे चढू शकाल. कार्यक्षेत्रात आपली पत वाढू शकेल. कुटुंबात मात्र सौहार्द्र टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्याकडेही लक्ष हवे.
शुभ दिनांक - 9, 10, 11, 13.
 
 
कुंभ (Aquarius) :उंच भरारीसाठी अनुकूल
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सहाव्या कर्म स्थानातून सुरू होत आहे तर राशिस्वामी शनी स्वतःच्या राशीत आहे. ही उत्तम स्थिती पाहता या आठवड्यात आपल्या महत्त्वाकांक्षा उंचावतील व त्यांना मूर्त रूप देण्यासाठी योग्य संधी लाभू शकतील, असे नि:संकोचपणे म्हणता येईल. हे ग्रहमान आपणास उंच भरारी घेण्यासाठी उत्साह व धाडस करण्याची क्षमता देईल. त्यामुळे व्यवसाय विस्ताराच्या वा काही नवे उपक्रम सुरू करण्याच्या योजना असतील तर त्या वेळीच हाती घ्या व मार्गी लावा. सुरुवातीला काहीशी दगदग-धावपळ करावी लागू शकते. शुभ दिनांक - 9, 10, 11, 12.
 
 
मीन (Pisces) : आर्थिक घडी बसावी
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या शुभ स्थानामधून सुरू होत आहे तर राशिस्वामी गुरू पराक्रम स्थानात विराजमान आहे. या आठवड्याची सुरुवात आपणास अतिशय उत्तम ठरू शकते. या शुभ योगामुळे आपणास काही भाग्यकारक संधी लाभू शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात, समाजात आणि कुटुंबात काही चांगल्या घटनांचे अनुभव लाभावेत. आर्थिक घडी बसावी. युवांना चांगले योग यावेत. सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र जुनी दुखणी असणार्‍या मंडळींनी आरोग्याची काळजी घ्यावी. औषधोपचार, पथ्य-पाण्याकडे दुर्लक्ष करू नये. दगदग-धावपळ टाळावी.
शुभ दिनांक - 8, 9, 10, 11.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746