प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    दिनांक :08-Jul-2024
Total Views |
- केवळ 1 रुपयात विम्याची नोंदणी
- नोंदणीसाठी 15 जुलै अंतिम तारीख
 
यवतमाळ, 
शेतकर्‍यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री सर्वकष Pikvima Yojana पिकविमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागासाठी 15 जुलै अंतिम तारीख आहे. शेतकर्‍यांनी या मुदतीत आपल्या पिकांची नोंदणी करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Pik Vima 
 
अधिसूचित खरीप हंगाम 2024 करिता ज्वारी, सोयाबीन, मुंग, उडीद, तूर, कापूस या पिकाकरिता पीक विमा क्षेत्र घटक धरून योजना राज्यात राबविण्यात येत आहे. योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. मागील वर्षापासून शेतकर्‍यांना प्रति अर्ज केवळ 1 रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिकनिहाय प्रति हेक्टर विमा हप्ता दर व शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रुपये 1 वजा जाता उर्वरीत फरकाची रक्कम राज्य शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.
 
 
Pikvima Yojana पीक विमा भरण्यासाठी आपल्या नजीकच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी. या केंद्रावर केवळ 1 रुपया विमा रकमेव्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी ही विमा कंपनी असून कंपनीचा टोल फ‘ी क‘मांक 18001024088 आहे. विमा काढण्याची कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यास अंतिम मुदत 15 जुलै आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी अंतीम मुदतीच्या आतच पीकविमा भरावा, असे आवाहन पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी महेश वैद्य यांनी केले आहे.