अजित पवारांसह राकाँ नेत्यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

    दिनांक :09-Jul-2024
Total Views |
- पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला
 
मुंबई, 
Ajit Pawar - Darshan of Shri Siddhivinayak : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत मंगळवारी श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेत विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरू करणार आहे. त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकार्‍यांसोबत श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले, असे अजित पवार यांनी माध्यमांसोबत चर्चा करताना सांगितले.
 
 
Ajit pawar
 
Ajit Pawar - Darshan of Shri Siddhivinayak : आम्ही जनतेसमोर आशीर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिद्धीविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे. शेवटी जनता-जनार्दन सर्व काही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. कामाची सुरुवात गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा असून, त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी राकाँचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.