राजकीय षडयंत्रातून लोकेश यादवंना हत्याकांडात गोवले : स्वाती यादव

पत्रपरिषदेत माहित

    दिनांक :09-Jul-2024
Total Views |
गोंदिया, 
Swati Yadav : उज्वल मेश्राम हत्याकांडात पती लोकेश यांचा कसलाही संबंध नसताना केवळ राजकीय दबाव व षडयंत्रामुळे विनाकारण त्यांना गोवण्यात आले आहे. लोकेश यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील सूत्रधार प्रशांत मेश्राम 7 महिन्यांपासून मोकाट आहे, त्याला अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही, प्रशांत मेश्रामला अटक करावी, विनाकारण अटक करण्यात आलेल्या लोकेश यादव यांना मुक्त करावे, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उज्वल मेश्राम हत्याकांडातील आरोपी लोकेश यादव यांची पत्नी स्वाती यादव यांनी आज 9 जुलै रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे.
 
 
JKJHK
 
शहरातील यादव चौकात 11 जानेवारी रोजी लोकेश यांच्यावर मृतक उज्वलचा काका प्रशांत मेश्राम त्यांच्या सांगण्यावरून दुचाकीने आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात लोकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आजही उपचार सुरू आहे. दरम्यान शहरातील कुंभारे नगर येथील आंबेडकर भवनाजवळ 18 जून रोजी उज्वल मेश्राम या 17 वर्षीय युवकाची हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. प्रकरणाशी लोकेश यांचा कोणताही संबंध नसताना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोलीस घरी येत विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. त्यांची विचारपूस न करता त्यांच्यावर 302, 120 व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार खोटा गुन्हा नोंद केला. हा सर्व प्रकार राजकीय दबावाखाली करून त्यांचा राजकीय भविष्य मलीन करण्याचा प्रकार केला जात आहे. पोलिसांनी लोकेश यांच्यावर हल्ला करणार्‍या मुख्य आरोपी प्रशांत मेश्रामला अटक करावी व लोकेश यांची उज्वल मेश्राम प्रकरणातून सुटका करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा स्वाती यादव व कुटुंबीयांनी पत्र परिषदेतून दिला आहे. यावेळी ललिता पंकज यादव, नीलम छगन यादव, रिंकी रमेश यादव, राकेश सुंदरलाल यादव व कुटुंबीय उपस्थित होते.
 
 
कोणताही राजकीय दबावातून आरोपी लोकेशला अटक करण्यात आली नाही. हा तपासाचा व गोपनीयतेचा भाग असून अधिक माहिती सांगता येणार नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी तरुण भारतला सांगितले.