'या' 7 वास्तु नियमांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी घरात करेल नेहमी वास

    दिनांक :09-Jul-2024
Total Views |
Vastu Tips : वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशांना स्वतःचे महत्त्व दिले आहे. वास्तूच्या नियमांचे पालन करून घर, ऑफिस इत्यादी बांधल्यास जीवनात अनेक चांगले परिणाम मिळतात. वास्तुदोषांमुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वास्तुचे कोणते नियम पाळल्यास तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. हे काही नियम आहेत जे सहज वापरता येतात.

vastu 
 
 
वास्तुच्या या नियमांचे पालन करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करा
 
1) देवी लक्ष्मी नेहमी अशाच घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता असते. त्यामुळे घराची नियमित स्वच्छता करावी, असे केल्याने आरोग्य चांगले राहते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते.

 
2) वास्तूनुसार जर तुम्ही घर बांधत असाल तर घरात पुरेसा प्रकाश येईल हे ध्यानात ठेवावे. परंतु काही कारणास्तव घरात पुरेसा प्रकाश येत नसेल तर उगवत्या सूर्याचे चित्र घराच्या पूर्व दिशेला लावावे. असे केल्याने नशिबाची साथ मिळते आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

 
३) घरातील फर्निचरमुळे तुमच्या घराची वास्तूही खराब होते. त्यामुळे त्रिकोणी आकाराचे फर्निचर कधीही खरेदी करू नये. घरामध्ये नेहमी गोलाकार किंवा चौकोनी फर्निचर बसवावे. जर तुम्ही तुमच्या घरात त्रिकोणी फर्निचर बसवले तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

 
4) बरेच लोक आपल्या घराच्या गच्चीवर कचरा साठून ठेवतात आणि ते नियमित साफ देखील करत नाहीत. असे केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. म्हणून, घराच्या छतावर कधीही कचरा गोळा करू नये आणि आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा छप्पर साफ करणे आवश्यक आहे.

 
५) शूज आणि चप्पलही घरात नीट ठेवा. अनेकजण शूज आणि चप्पल कुठेही ठेवतात, यामुळेही वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी एकच जागा बनवा आणि तिथे ठेवा. जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ शूज आणि चप्पल ठेवत असाल तर त्यांना अशा ठिकाणी ठेवा जेथे घरात येणारे लोक त्यांना प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत.

 
6) जर तुम्हाला तुमच्या घरात धन-संपत्तीचे आशीर्वाद हवे असतील तर स्वयंपाकघरात नेहमी पाण्याने भरलेले भांडे ठेवा. शक्य असल्यास तांब्याचे भांडे पाण्याने भरून ठेवू शकता. मात्र, हे पाणी तुम्ही रोज बदलावे.

 
7) देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात तुळशीचे रोप अवश्य ठेवावे. परंतु लक्षात ठेवा की या वनस्पतीची नियमित काळजी घ्या. यासोबतच एकादशी, पौर्णिमा किंवा रविवारी त्याची पाने तोडू नका.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तरुण भरात एकाही गोष्टीच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.)