शिवाजी महाविद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा

01 Aug 2024 18:47:46
देवरी
Teacher-Parent Meeting स्थानिक छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ३१ जुलै रोजी शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन प्राचार्य एम. जी. भुरे यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले.
 

devri 
  
प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम शिवणकर, जयश्री चांदेवार, एस. टी. भांडारकर उपस्थित होते. प्रथम माता शारदा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर शिक्षक पालक संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये जयश्री चांदेवार, उत्तम पोले, भाऊराव सोनवाने व पुरुषोत्तम शिवणकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पालकांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करण्यात आले.Teacher-Parent Meeting प्रसंगी प्राचार्य एम. जी. भुरे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक एस. टी. भांडारकर यांनी मांडले. संचालन टी. एस. कळंबे यांनी केले. आभार ए. टी. मते यांनी मानले. आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0