- डॉ. प्रज्ञा यादव, डॉ. रॉक्सी मॅथ्यु कोल यांचा समावेश
पुणे,
पुण्यातील दोन शास्त्रज्ञांना मानाचा 'Shanti Swaroop Bhatnagar' award शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (एनआयव्ही) येथे कार्यरत असलेल्या तरुण शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे (आयआयटीएम) डॉ. रॉक्सी मॅथ्यु कोल यांचा समावेश आहे.
'Shanti Swaroop Bhatnagar' award डॉ. प्रज्ञा यादव एनआयव्हीमध्ये बायोसेफ्टी लेव्हल-४ प्रयोगशाळेच्या प्रमुख आहेत. ही प्रयोगशाळा आशिया खंडातील पहिली असून, त्यांनी कोरोनाच्या काळात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला. सध्या त्यांच्याकडे नागपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थच्या संचालकपदाचा प्रभारी कार्यभारही आहे. केंद्र सरकारने शास्त्रज्ञांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील पहिला ‘राष्ट्रीय विज्ञान’ पुरस्कार जाहीर केला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार संशोधकांच्या उत्कृष्ट, प्रेरणादायी वैज्ञानिक, तांत्रिक आणि नावीन्यपूर्ण योगदानासाठी दिला जाणार आहे. येत्या २३ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
डॉ. प्रज्ञा यादव यांच्या संशोधनाची दखल
देशातील १३ शास्त्रज्ञांना ‘विज्ञान श्री’, तर १८ जणांना ‘विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. यादव यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतातील कोरोनाच्या विषाणूचे त्वरित विलगीकरण करण्याच्या दिशेने त्यांनी भूमिका बजावली होती, ज्याचा उपयोग भारत बायोटेक लि. कंपनीला पहिली स्वदेशी लस (कोव्हॅक्सिन) तयार करण्यासाठी झाला होता.
'Shanti Swaroop Bhatnagar' award डॉ. रॉक्सी मॅथ्यु कोल हे येथे हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. पृथ्वी आणि अंतराळ विज्ञानातील त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांनी दक्षिण आशिया आणि भारत-प्रशांतमधील हवामान बदलाच्या अंदाजावर योगदान दिले आहे. हवामान बदलाच्या परिणामात मान्सून काळातील पूर, दुष्काळ, चकि‘वादळे, उष्णतेच्या लाटा आणि सागरी परिसंस्थांवरील त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.