डॉ. अभ्युदय मेघे संबंध नाही; आ. भोयरसाठी काम करणार

*सागर मेघे यांची प्रतिक्रिया

    दिनांक :10-Aug-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Sagar Meghe : उदय मेघे यांनी कोणतीही कल्पना न देता किंवा आमच्या परिवाराला विश्वासात न घेता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. आता आपले त्यांच्यासोबत संबंध राहिले नाहीत. आपण भाजपाचे संभाव्य उमेदवार डॉ. पंकज भोयर यांना विजयी करण्यासाठीच काम करणार असल्याची माहिती दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार व माजी आमदार सागर मेघे यांनी दिली प्रसिद्धी पत्रकातून दिली.
 
 
j ih
 
डॉ. अभ्युदय मेघे यांचे 20 वर्षांपासून संस्थांतर्गत कामामुळे जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्यांना महत्त्वपूर्ण पद देऊन संस्थेच्या हिताची जबाबदारी सोपवली असताना नैतिकतेचे पालन न करता अचानक आपल्या पाठीत खंजीर खुपसेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असेही प्रसिद्धी पत्रकातून नमुद करण्यात आले आहे.
 
 
 
त्यांचे हे कृत्य विश्वासघात करणारे असून या पुढे आपला चेहराही दाखवू नको, असा निरोप व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिला आहे. आमच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार असल्यास मेघे समूहाशी तसेच माझ्या परिवाराशी कोणतेही संबंध यापुढे राहणार नाही, असाही निरोप उदय मेघे यांना दिला आहे. यापुढे आपण त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. ज्या पक्षात उदय मेघे यांनी प्रवेश घेतला आहे तो पक्ष उदय मेघेला विधानसभेची उमेदवारी देईल असे मला वाटत नाही. त्यांना उमेदवारी दिल्यास भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार डॉ. पंकज भोयर निवडून यावेत यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया सागर मेघे यांनी दिली आहे.