माले,
द्वीपसमूह देशात UPI in Maldives युनिफाईड पेमेन्ट्स इंटरफेस अर्थात् यूपीआय सुरू करण्यासाठी भारत आणि मालदीवमध्ये करार झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम पर्यटन क्षेत्रावर होईल, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. एस. जयशंकर यांच्या तीन दिवसीय अधिकृत मालदीव दौर्यात शुक्रवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि मालदीवच्या आर्थिक विकास मंत्रालयात झालेल्या कराराचा साक्षीदार होतो, असे जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
UPI in Maldives मोबाईलद्वारे आंतरबँकिंग सेवा उपलब्ध करून देणारी ही युनिफाईड पेमेन्ट इंटरफेस नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशनने विकसित केली आहे. भारताने आपल्या यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल क्रांती केली, असे जयशंकर यांनी मालदीवमधील त्यांचे मूसा झमीर यांच्यासोबत झालेल्या फलदायी चर्चेनंतर पत्रपरिषदेत सांगितले. भारतातील आर्थिक समावेशन नवीन पातळीवर गेले आहे, यावर भर देताना जयशंकर यांनी सांगितले की, जगातील एकूण व्यवहारांच्या ४० टक्के व्यवहार आज आपल्या देशात डिजिटल पेमेन्ट्सच्या माध्यमातून होतात. आपल्या दररोजच्या आयुष्यात आपण ही क्रांतीपाहिली आहे. मालदीवसोबत करार करताना मला आनंद होत मालदीवमध्ये डिजिटल नाविन्य आणण्यासाठी टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे.