जळगावमधून तीन सायबर घोटाळेबाजांना अटक

    दिनांक :11-Aug-2024
Total Views |
- दिल्ली पोलिसांची कारवाई
 
नवी दिल्ली, 
Cyber ​​scammers arrested : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने एका महिलेची ३६.२७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जळगावातील तीन सायबर घोटाळेबाजांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. जयेश भोळे, राकेश जाधव आणि हर्षवर्धन भोसले अशी तिघांची नावे आहेत. भोळे विषयात पदवीपूर्व शिक्षण घेत असून, तो बेरोजगार आहे. जाधव हा पदवीधर असून, त्याचा वाहतूक व्यवसाय आहे, तर भोसलेने संगणक अभियांत्रिकीत पदविका घेतली.
 
 
Cyber ​​scammers arrested
 
Cyber ​​scammers arrested : २०२२ मध्ये पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यापासून तो बेरोजगार आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी फसवणुकीसाठी चालू बँक खात्यांचा वापर केला. महिलेच्या तक्रारीनंतर २५ जुलै रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि तपास हाती घेण्यात आला, असे पोलिस उपायुक्त रोहित मीणा यांनी सांगितले. १ जुलै रोजी ‘शेअर इंडिया’ समूहाच्या संपर्कात आली. आपल्या बँक खात्यातून विविध व्यवहारांच्या माध्यमातून ३६.२७ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी तिला सांगण्यात आले होते.