पोलिस दलाकडून वणी बसस्थानकात ‘बॉम्ब कॉल’ची तालीम

11 Aug 2024 14:20:58
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Vani Bus Stand : जिल्ह्यात होणार्‍या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बॉम्बस्फोटाच्या प्रसंगी पोलिसांतर्फे करावयाच्या कार्यपद्धती अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या वतीने १० ऑगस्ट रोजी १२ ते १ दरम्यान वणी बसस्थानक येथे ‘बॉम्ब कॉल’ची रंगीत तालीम घेण्यात आली.
 

y10Aug-Talim 
 
 
या अनुषंगाने वणी बसस्थानक वाहनस्थळावर अज्ञात इसमाने घातपाताच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवल्याची माहिती यवतमाळ पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलिसांकडून तातडीने घटनास्थळ गाठून बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाद्वारे संपूर्ण घटनास्थळाची तपासणी आली. बॉम्ब असलेल्या बॅगला बसस्थानकातील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन निकामी करण्यात आले.
 
 
त्यानंतर ‘फॉरेन्सिक लॅब’च्या मदतीने घटनास्थळावरील भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. ही रंगीत तालीम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात दहशतवादविरोधी शाखाप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सारंग बोंपिलवार, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक परांडे, क्युआरटी पथकप्रमुख पोउपनि धवणे, तसेच वणीचे पोलिस निरीक्षक अनिल बेहारणे, वाहतूक शाखा वणी सहायक पोलिस निरीक्षक वाघमारे, अंगुलीमुद्रा वैद्यकीय अधिकारी सपोनि सुरेश परसोडे, अग्निशामक दल यांनी केली.
Powered By Sangraha 9.0