मुंबई,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार Supriya Sule सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि वॉट्सअॅप हॅक करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती सुळे यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली. आपला फोन आणि वॉट्सअॅप हॅक झाल्याचे सुप्रिया सुळे यांना रविवारी दुपारी लक्षात आले. तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती सोशल मीडियावरून दिली.
Supriya Sule : त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, माझा फोन आणि व्हॉट्सअॅप झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलिस तक्रार करीत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे सुळे यांनी म्हटले आहे. खासदारासारख्या व्यक्तीचा मोबाईल हॅक होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. मात्र, मोबाईल खरच हॅक झाला का, झाला असेल तर, कोणी केला, याचा शोध आता घ्यावा लागणार आहे.