तस्करांच्या तावडीतून 8 गोवंशांची सुटका

11 Aug 2024 16:23:00
-स्थानिक पोलिसांची कारवाई
 
अकोला,
राज्यात गोवंश हत्याcow trafficking प्रतिबंधक कायदा असला तरी जिल्हड्यात अनेक ठिकाणी गोवंशाची तस्करी आणि कत्तल केली जात आहे. अशाच एका प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी हिवरखेड हद्दीत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्‍या वाहनास पकडले व त्यातील निर्दयपणे बांधलेल्या 8 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. तसेच दोन चारचाकी वाहनांसह यातील गोवंश तस्कर असलेल्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 12,00,100 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
 
 

ghghg  
अकोला जिल्ह्यात मोठ्याcow trafficking प्रमाणात गोवंशांची अवैध वाहतूक करून त्यांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षकांनी अशा कुठल्याही अवैध प्रकारास प्रतिबंध करावा, असे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी गोवंशाची अवैध वाहतूक पकडण्यासाठी पथक गठीत केले. या पथकाने शनिवार 10 ऑगस्ट रोजी पो.स्टे. हिवरखेड हद्दीतील शक्ती चौकात नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्तली करीता घेवून येणारे दोन चार चाकी मालवाहू वाहने पकडून त्या मध्ये 8 गोवंश जातीचे जनावरे पाहून त्यांची सुटका केली.यांची अंदाजे किंमत 2 लाख रूपये आहे.
 
गोवंश वाहतुकीकरिताcow trafficking वारपरण्यात आलेली दोन चारचाकी मालवाहू वाहणे किं. अं 10,00,000 रू असा एकूण 12,00,100 मुद्देमाल हस्तगत करून आरोपी अब्दल नाजीम अब्दुल नजीर व शेख कासीम शेख नजीर या दोघांना पुढील तपास कामी पो स्टे हिवरखडे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच पकडलेला गोवंश पुढील संगोपनाकरिता गौरक्षण संस्था, दर्यापूर रोड, आकोट येथे ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर शेळके उपनिरीक्षक आशिष शिंदे, उपनिरीक्षक विनोद ठाकरे व अंमलदार प्रमोद ढोरे, सुलतान पठान, खुशाल नेमाडे, धीरज वानखडे, आकाश मानकर, स्वप्निल चौधरी, अभिषेक पाठक, सतीश पवार, अशोक सोनोने यांनी केली.
Powered By Sangraha 9.0