शिरपूर जैन,
जानगिर महाराजnagnath temple संस्थानच्या दक्षिण दिशेला नागनाथ संस्थान आहे. हे औंढा नागनाथचे उपलिंग म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात श्रावण मासानिमित्त नागनाथास लाखोळी वाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भक्त येत असतात. याबाबत आख्यायिका अशी आहे की, येथील देशमुख घराण्यातील पाचशे वर्षांपूर्वी एक भक्त होऊन गेले. ते औंढा नागनाथ येथे दर सोमवारी नित्यनेमाने घोड्यावरून वारी करायचे. परंतु, नियत वयोमानानुसार वारी करणे शक्य झाले नाही. तेव्हा ते आपले जर्जर म्हातारे शरीर घेऊन औंढा नागनाथ येथे गेले व देवापुढे प्रार्थना केली. ‘शरीराला कष्ट झाले भारी, पावन करावी माझी शेवटची वारी’ त्याचबरोबर तेथे आकाशवाणी झाली त्यांनी भक्ताला सांगितले तुझी वारी पावन झाली. मी तुझ्या देवघरात येतो.
तू आपल्या घरीnagnath temple परत जा. परंतु, जाताना मागे पाहू नकोस असे म्हणून भगवंत लुप्त झाले. त्यानंतर भक्त घरी येण्यास निघाले. गावाजवळील आपल्या शेताजवळ आल्यानंतर खरोखरच भगवंत आपल्या सोबत येत आहेत का? म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. त्यावेळेस तेथे भव्य असे शंकराचे रूप प्रकट झाले व स्वयंभू लिंग स्थापन झाले. हे औंढा नागनाथाचे उप लिंग गेले पाचशे वर्षांपासून भाविकांच्या दर्शनासाठी शिरपूर नगरीच्या उत्तरेस निसर्गरम्य अशा परिसरात बसलेले आहे. या मंदिराची पूर्ण बांधणी हेमांडपंथी आहे. परंतु, आता मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असून आता मंदिर नव्या पध्दतीने बांधण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्यात स्वयंभू शिवलिंग असून बाहेर सभा मंडपात नंदी विराजमान आहे. त्याच बाजूला अखंड दगडाची भव्य असे गणेशाची मूर्ती आहे. तर बाजूला प्राचीन बारव आहे. समोरच्या बाजूला सतीचे मंदिरे व नवग्रह मंदिर आहेत. संस्थांनवर येण्यासाठी रस्ता आहे येथे नागपंचमीला व महाशिवरात्रीला नागनाथास अभिषेक करण्यात येतो. तर अंबालिका बारसेला भागवत सप्ताह व भंडारा होतो. नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात व दर्शन घेऊन पावन होतात. नागनाथ संस्थान जागृत संस्थान आहे. याचा अनेक भक्तांना अनुभव आला आहे. श्रावण मासानिमित्त दरवर्षी कावड मंडळ कोणत्याही एका ज्योतिर्लिंगा वरून जल आणून महादेवाला जलाभिषेक करतात. जास्तीत जास्त भाविकांनी शिरपूर येथे येऊन औंढा नागनाथ येथे जाऊन आल्याची प्रचिती करून घ्यावी.