अस्सल सेंद्रीय पदार्थ घेण्याची संधी नागपूरकरांना मिळणार !

ऑर्गेनिक तूर डाळीपासून धारणीतील नैसर्गिक मधापर्यंत

    दिनांक :11-Aug-2024
Total Views |
नागपूर,
नाबार्डअंतर्गत विविधorganic food for nagpurians शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या विविध उत्पादनांना थेट त्यांच्याकडूनच अस्सल सेंद्रीय पदार्थ घेण्याची संधी नागपूरकरांना तीन दिवस मिळणार आहे. जवाहर विद्यार्थीगृह, सिव्हील लाईन्स येथे दिनांक 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या तरंग मेळाव्यात विविध उत्पादनांचा समावेश असल्याची माहिती नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

dfdfd 
सुमारे 85 टक्के शेतकरी organic food for nagpuriansहे लघू व मध्यम जमीनधारक आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक शेती, नवतंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून नाबार्ड बँक प्रयत्नशील आहे. त्यांनी उत्पादीत केलेल्या विविध कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळावा व विक्रीचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी सांगड घालण्यासाठी महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊनच एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्याची मोठ्या प्रमाणात स्थापना करुन नाबार्डने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चालना दिली. या शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित सेंद्रीय तूरडाळ, तांदूळ, अस्सल हळद, मिरची, मोह फुलांचे विविध उत्पादने, रामटेक येथील सेंद्रीय गूळ, विविध मसाले पदार्थ, कडधान्य आदी पदार्थांचे एकूण 43 स्टॉल्स या मेळाव्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचबरोबर या मेळाव्यात वित्त पुरवठा, विविध योजनांची माहिती, कृषीपूरक उद्योग, मत्स्य व्यवसाय याबाबत तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. 10 ते 12 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित या मेळाव्यास जास्तीत जास्त नागपूरकरांनी भेट देऊन विविध सेंद्रीय उत्पादने खरेदी करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहेत.