घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकने सोडले मौन

    दिनांक :12-Aug-2024
Total Views |
मुंबई,
Aishwarya Rai Bachchanअभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील नातं हा चर्चेचा विषय राहिला आहे. या जोडप्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा उडत आहेत. ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याचे बोलले जात आहे. तरी यात किती तथ्य आहे? यावर स्वत: अभिषेक बच्चन बोलले. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे.
 
abhishekh
पण आता अभिषेक बच्चनने सांगितले की तो व्हिडिओ डीपफेक होता आणि तो अजूनही विवाहित आहे. अभिषेक बच्चनच्या डीपफेक व्हिडिओमध्ये तो आणि ऐश्वर्या रायने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे तो म्हणत होता. यासोबतच त्यांची मुलगी आराध्याबद्दलही बोलले जात होते. Aishwarya Rai Bachchan मात्र आता यावर अभिषेक बच्चन संतापला आहे. याबद्दल त्याने खुलेपणाने सांगितले आणि सांगितले की या सर्व अफवा आहेत आणि तो आणि ऐश्वर्या एकत्र आहे.