बांगला देशातील हिंसाचाराविरोधात आज निवेदन उद्या मोर्चा

    दिनांक :12-Aug-2024
Total Views |
- साई मंदिर येथे विविध संघटनांची बैठक

वर्धा, 
Bangladesh violence बांगलादेशात असलेल्या हिंदूवर अत्याचार होत आहे. या निषेधार्थ विविध हिंदू समाजातील संघटनांची बैठक आज सोमवार 12 रोजी स्थानिक साई मंदिरात झाली. यावेळी मंगळवार 13 रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन तर बुधवार 14 रोजी शहरातून निषेध मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले. बैठकीत बांगलादेश येथे हिंदूवर होणार्‍या अत्याचारासंदर्भात तसेच वर्धा शहराच्या आजूबाजूच्या परिसरात अवैधपणे राहणार्‍या बांगलादेशी लोकांच्या वास्तवाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
 
 
wardh
 
उद्या मंगळवार 13 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर अवैधपणे राहणार्‍या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. बुधवार 14 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निषेध मोर्चा शहरात मार्गक्रमण करून शिवाजी चौकात समारोप होईल.
 
 
Bangladesh violence या बैठकीला संजिव लाभे, सुभाष राठी, सचिन अग्निहोत्री, शालिग्राम टिबडीवाल, अटल पांडे, जयंत येरावार, निलेश पोहेकर, उमेश अग्निहोत्री, मंगेश परसोडकर, सुवर्णा काणे, वैशाली येरावार, वंदना भुते, अनुराधा महाकाळकर, तुषार देवढे, अनुराधा भोकरे आदींची उपस्थिती होती. निवेदन देते वेळी तसेच मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.