पराभवाच्या भीतीपोटी ‘लाडकी बहीण’ योजनेवर ठाकरेंची टीका

    दिनांक :12-Aug-2024
Total Views |
- भाजपाचा हल्लाबोल
- महिला मोर्चा फडणवीसांना पाठविणार २५ लाख रा‘या

मुंबई, 
महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा हल्लाबोल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष Chandrasekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २५ लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी रा‘या पाठवणार आहेत अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
 
 
Chandrasekhar Bawankule
 
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ पहिला हप्ता १७ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ही कायमस्वरुपी योजना असून, महिलांनी या १८ हजार रुपयांमधील किमान ३ हजार रुपयांचा विमा उतरवला तरी, त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच मिळू शकेल इतकी ताकद या योजनेत असल्याचे Chandrasekhar Bawankule बावनकुळे यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार करीत उद्धव ठाकरे यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. धनाढ्याच्या घरात जन्माला आलेल्यांना या योजनेचे मोल कळणार नाही. महिला वर्गासाठी उपयुक्त योजनेची खिल्ली उडवून उद्धव ठाकरे यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
महायुती सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आत्मसन्मान देण्यासाठी प्रतिमहिना दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये जमा करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केल्याबद्दल बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि सहकार्‍यांचे सरकार असलेल्या कर्नाटक, हिमाचलप्रदेशमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहलक्ष्मी योजनेचे आश्वासन देऊन मते घेतली आणि सत्ता आल्यानंतर योजना बंद केली. जनतेशी अशी लबाडी करणार्‍यांना लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही. पार्टीसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना या योजनेत लबाडीच दिसते, यात नवल नाही.