बंगालमध्ये रुग्णालय सेवा विस्कळीत

    दिनांक :12-Aug-2024
Total Views |
- चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच
- महिला डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरण

कोलकाता, 
Doctors Rape murders  : एका महिला डॉक्टरच्या बलात्कार हत्येच्या निषेधार्थ आणि तिच्या हत्या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्याच्या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्टर, इंटर्न व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींचा सलग चौथ्या दिवशी संप सुरू होता. त्यामुळे सोमवारी पश्चिम बंगालमधील रुग्णालय सेवा विस्कळीत झाली. गत तीन दिवसांपासून डॉक्टर आपत्कालीन कर्तव्यासाठी उपस्थित होते, परंतु सोमवारी सकाळपर्यंत ते आपल्या कर्तव्यावर हजर झाले नव्हते, असे सूत्रांनी आम्हाला आमच्या सहकार्‍याच्या हत्येचा निष्पक्ष तपास सीबीआय किंवा विद्यमान दंडाधिकारी यांच्याकडून हवा आहे.
 
 
Doctors Rape murders
 
Doctors Rape murders सध्याच्या पोलिस तपासावर आम्ही असमाधानी आहोत व जोपर्यंत न्याय मिळत नाही व राज्य सर्व डॉक्टर्स व आरोग्यसेवेसाठी सुरक्षित सुरक्षा सुनिश्चि करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे, असे आरजी कार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील आंदोलक कनिष्ठ सांगितले. पदव्युत्तर महिला डॉक्टर प्रशिक्षणार्थी महिलेचा मृतदेह शुक‘वारी सकाळी रुग्णालयाच्या परिसंवाद सभागृहात आढळून आला. याप्रकरणी शनिवारी एका नागरी स्वयंसेवकाला अटक करण्यात आली. परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.