- अज्ञात आरोपींनी केला गोळीबार
- चंद्रपुरातील बिनबा गेट परिसरातील घटना
चंद्रपूर,
Haji Sheikh Sarwar घुग्घुस येथील कोळसा तस्करीचा आरोपी हाजी शेख सरवर याची अज्ञात आरोपींनी गोळीबार करून हत्या केली. ही घटना सोमवार, 12 ऑगस्ट रोजी दुपारी येथील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलात घडली. चंद्रपुरात गोळीबारीच्या घटनेमध्ये एव्हाना सातत्याने वाढ होत असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने महानगरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास हाजी शेख सरवर हा चंद्रपुरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार या हॉटेलात जेवण करीत होता. त्यावेळी 6 ते 5 जण शस्त्र घेऊन तेथे आले आणि त्यांनी हाजी शेख सरवर याच्यावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत हाजी शेख सरवर यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती शहरातच पसरातच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
Haji Sheikh Sarwar जुन्या वैमनयातून हाजी शेख सरवर याची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची स्वरूपाची होती. अवैध कोळसा व्यापारात त्यांचा दरारा होता. त्यांच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल होते. गोळीबाराच्या या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.