अनुराग जैन वर्धेचे नवीन पोलिस अधीक्षक

13 Aug 2024 20:57:00
वर्धा,
Anurag Jain : 23 महिन्यांपूर्वी अगदी दिवाळीच्या दिवशी वर्धेच्या पोलिस अधीक्षकपदाची सुत्रं सांभाळलेले नुरूल हसन यांची बदली झाली असुन त्यांच्या जागेवर अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

wardha 
जैन नागपूर शहर पोलिस उपायुक्त होते तर हसन यांची राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11 नवी मुंबईचे समादेशक म्हणून बदली झाली आहे. हसन यांनी वर्धेत रूजू होताच दारूबंदीसाठी प्रचंड प्रयत्न केले. अनेक गुन्ह्यांचा तपासही त्यांच्या काळात लागला. विशेष म्हणजे पोलिस प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील दरी त्यांनी कमी केली होती. नव्याने रूजू होणारे पोलिस अधीक्षक जैन यांच्यापुढे दारूबंदी हे मोठे आव्हान आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0