मुंबई,
Karthik Aryan बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच दरम्यान त्याच्या चाहत्यांचे वेड कधी-कधी स्टार्ससाठी अडचणीचे कारण बनते. अलीकडे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन पीव्हीआरच्या बाहेर दिसत आहे. तो बाहेर येताच, त्याचे चाहते त्याला घेरतात आणि फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतात, या दरम्यान त्याच्याशी गैरवर्तन देखील केले जाते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक तरुण गर्दीत शिरतो आणि कार्तिक आर्यनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि फोटो क्लिक करू लागतो, जणू तो त्याचा जुना मित्र आहे. यानंतर सुरक्षा कर्मचारी त्या तरुणाला बाहेर काढतात.
यावेळी कार्तिक आर्यनची बहीणही उपस्थित होती. अवघडून तो गर्दीतून बाहेर येतो आणि गाडीत बसतो. हा व्हिडिओ खूपच धक्कादायक असून लोक त्यावर चर्चा करत आहेत. Karthik Aryan मात्र, कार्तिक आर्यनने आपला धीर गमावला नाही आणि अतिशय सहजतेने परिस्थिती हाताळली. त्याचे शांत वागणे लोकांना खूप आवडले. कार्तिक आर्यन लवकरच ‘भूल भुलैया ३’ मध्ये दिसणार आहे. "भूल भुलैया" च्या पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता, ज्यामध्ये विद्या बालन आणि शायनी आहुजा देखील होते. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या दुस-या भागात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया’च्या तिसऱ्या भागात पुन्हा कमबॅक करत असून त्याच्यासोबत तृप्ती डिमरी ही जोडी दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.