मोर्शी,
Upper Wardha Dam सोमवार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे ४० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून ६९३ क्युसेक घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणार्या मोर्शीपासून केवळ ८ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच जलालखेडा येथून वाहत असलेल्या वर्धा नदीला महापूर आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून वर्धा नदीला जोडल्या गेललेले इतर नदी, नाले इत्यादींचा विसर्ग नदीच्या पात्रामध्ये राहणार असल्यामुळे नदीचे पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता बघता व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अप्पर वर्धा धरणाचे तेरापैकी ११ वक्रद्वारे ४० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन त्यामधून ६९३ घन सेंटीमीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. Upper Wardha Dam सध्या धरणात ७१९ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा सुरू आहे. त्यामुळे वर्धा नदी काठावरच्या गावातील ग्रामस्थांना मुनादीद्वारे तसेच मासेमार्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
१२ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असून विविध जिल्ह्यातील पर्यटक अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. अप्पर वर्धा धरणाची जलपातळी जुलै अखेरपर्यंत ७४ टक्क्याच्या खाली होती. १२ ऑगस्ट रोजी पाण्याच्या साठ्याची टक्केवारी ८६.१९ एवढी झाल्याने अप्पर वर्धा धरणाचे गेट उघडण्याची वेळ आली आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मिलिमीटर एवढी ठेवण्यात आली असून सध्या ही पातळी ३४१.६१ मिलिमीटर झाली आहे. त्यामुळे जवळपास ८६.१९ टक्के धरण भरलेले आहे. Upper Wardha Dam अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळ असल्यामुळे मध्यप्रदेशातून वाहत येणारी जामनदी व माडू नदी तुडूंब भरून वाहत असल्याने धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यातच अप्पर वर्धा धरणाचे ११ गेट उघडण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अप्पर वर्धा धरणाची ३ वक्रद्वारे उघडण्यात आली होती. आज पुन्हा १२ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या दुसर्या सोमवारी १३ पैकी ११ गेट उघडण्यात आले आहे.