अधीक्षकांची फक्त अफवाच !

    दिनांक :14-Aug-2024
Total Views |
वर्धा,
वर्धेचे पोलिसAnurag Jain IPS अधीक्षक नुरूल हसन यांची मुंबई येथे राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11 येथे समादेशक म्हणून बदली झाली. त्यामुळे वर्धेचे पोलिस अधीक्षक म्हणून नागपूर (शहर) उपायुक्त अनुराग जैन यांना जबाबदारी देण्यात आली. या घडामोडी काल 13 रोजी सायंकाळी घडल्या. हेही वाचा : अनुराग जैन वर्धेचे नवीन पोलिस अधीक्षक
 
 

fgfg 
मात्र, आज सकाळपासून Anurag Jain IPSवर्धेचे पोलिस अधीक्षक म्हणून कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची वर्धेत समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे. या संदर्भात अनुराग जैन यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी आपल्या नावाची अफवा असल्याचे सांगितले. आपण वर्धेत कधी रूजू होणार असे विचारले असता वरिष्ठांची परवानगी घेऊन रूजू होऊ असे नवनियुक्त पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. पोलिस अधीक्षक जैन यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये बीटेक केले आहे. आयआयटी दिल्ली येथून त्यांनी एम टेकही केले आहे. ते 2016 च्या युपीएससी तुकडीचे आहेत.