स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख यांना जाहीर

15 Aug 2024 13:00:00
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
Asha Parekh : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २०२३ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शिवाजी साटम यांना बुधवारी जाहीर झाला.
 
 
AASHA
 
 
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, दिनांक २१ ऑगस्ट एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
 
 
 
स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.
 
 
दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ मु‘यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु‘यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी वरळीत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0