नि रे ग....संग स्वर यात्रा

    दिनांक :17-Aug-2024
Total Views |
नागपूर,
Sudarshan Hall प्रसिद्ध समूह विनायक ग्रुप तर्फे रविवार दि. १८ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता सुदर्शन हॉल, आर.पी.टी.एस. कंपाउंड, सुरेंद्रनगर, येथे "नि रे ग ...संग स्वरयात्रा".हा आगळावेगळा संगीताचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
vinayk
या समूहाच्या प्रत्येक जणाने अथक परिश्रम घेऊन आपली संगीत कला वृद्धिंगत केली आहे व त्या दिवशी प्रस्तुत करणार आहेत. ग्रुप चे संयोजक नागपूरचेच नंदकिशोर मुळे, स्नेहा जोशी, पवन शर्मा तसेच गायक कलाकार रवींद्र घोटकर, पंकज अढाऊ, सतीश दामोदरे, राहुल कुलकर्णी, शैलेश मुधोळकर, गिरीश तळवलकर,  निशा जी, रजनी राज, गौरी बावडेकर आपली संगीतकला प्रस्तुत करतील. व्ही. पी. सिंग व गौरी तळवलकर कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळतील. Sudarshan Hall संपूर्ण समूहाद्वारे नागपूरच्या जनतेस आवाहन करण्यात येते की ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घ्यावा व सर्व कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा प्रवेश निःशुल्क आहे.
सौजन्य: संदीप तिजारे, संपर्क मित्र