सिमेंट रोडमुळे भक्तांची गैरसोय दूर होईल

    दिनांक :02-Aug-2024
Total Views |
रिसोड,
सिमेंट कॉक्रीटpingla devi devasthan रोडमुळे पिंगलाक्षी देवीच्या भक्तांची गैरसोय दूर होईल असे प्रतिपादन आमदार भावना गवळी यांनी केले. त्या श्री पिंगलाक्षी देवी मंदिर येथील पन्नास लाख रुपये च्या सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या. पिंगलाक्षी देवी संस्थान येथील ५० लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून माजी आमदार विजय जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. सिमेंट रोडचे भूमिपूजन आमदार भावना गवळी यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. प्रमुख अतिथी राकॉ नेते भगवान क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, पिंगलाक्षी देवी संस्थानचे संचालक संतोष वाघमारे, गजानन पांडे, मनीष बगडिया, उपस्थित होते.
 
 

rtrt 
पुढे बोलताना pingla devi devasthanभावना गवळी म्हणाल्या की पिंगलाक्षी देवी संस्थान हे जागृत संस्थान असून, या परिसरा चे सौंदर्यीकरण करणार आहे, पिंगलाक्षी देवी संस्थानला मी २० लक्ष रूचा निधी दिला असून, संस्थान सांगेल ते काम मी त्या २० लक्ष रुपयांमधून करणार आहे. अध्यक्षक्षीय भाषणात माजी आमदार विजय जाधव म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकार ने ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. आज पन्नास लक्ष रुपयांच्या भूमिपूजन प्रसंगी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याने मला आनंद झाला आहे. यापुढे सुद्धा आमदार भावना गवळीच्या माध्यमातून पिंगलाक्षी देवीच्या परिसरासह रिसोड मतदार संघाचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पिंगलाक्षी देवी संस्थान तर्फे आमदार भावना गवळी, माजी आमदार विजय जाधव व भगवान क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत वसमतकर यांनी, संचालन नंदकिशोर मगर तर आभार प्रदर्शन डिगंबर जाधव यांनी केले.
 
या कार्यक्रमालाpingla devi devasthan नारायण सानप, लखनसिंग ठाकूर, अरुण मगर, अरुण क्षीरसागर, अंकुश देशमुख, भारत नागरे, सोमनाथआप्पा खके, बबनराव सुरूशे, विठ्ठलराव नरवाडे, भागवत गवळी, अरुण मगर, अरुण क्षीरसागर, कैलास महाजन, सुनील बेलोकार, अशोक सानप, सुनील खके, गोपाल जाधव, डि. के. सदार, राम बोरकर, राम जाधव, नितेश राठी, अजिंय जाधव आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.