विध्यार्थानी केले कृतज्ञतेचे रक्षाबंधन

20 Aug 2024 15:20:11
नागपूर, 
New English High School बहिण भावाला राखी बांधते म्हणजेच रक्षाबंधन, असे नसून जे जे आपल्याला विविध सेवा पुरवतात आपलं रक्षण करतात. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.हा रक्षाबंधनाचा उत्सव. याच विचाराने प्रेरित होवून, न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेसनगर, शाखेतील विविध सेवा पुरवणऱ्या डॉक्टर्स, पोलिस विभाग, ऑटो चालक, मेट्रो स्टेशनवर काम करणारे सर्व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थी ऑटो, व्हॅन व बसने येतात. तेव्हा शाळेतल्या सर्व गाडी चालकांना शाळेत त्यांचा सन्मान करून विद्याथ्र्यांनी त्यांना राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेतले.
श्रीकृष्ण हृदयालय, काँग्रेसनगर या ठिकाणी जाऊन तिथल्या सर्व कर्मचाऱ्याना राखी बांधून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हॉस्पिटलचे डॉ. महेश फुलवाणी यांनी मुलांचे खूप खूप कौतुक केले. त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना  राखी बांधली. पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर विनायक कोळी म्हणाले की, आज समाजामध्ये अशा उपक्रमांची खरच खूपआवश्यकता आहे.
  
merto 
 हा उत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला.New English High School याप्रसंगी न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे सहसचिव श्याम पत्तरकिने प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बोरघाटे व पर्यवेक्षिका मेघा पडळकर यांनी सर्व सहभागी शिक्षकांचे, विद्याथ्र्यांचे कौतुक केले. हा उपक्रम शाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश भोयर यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात साजरा करण्यात आला.
सौजन्य: सतीश भोयर,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0