बीएसएफच्या अधिकार्‍याने घडवला इतिहास

20 Aug 2024 21:22:21
- पूर्ण केली आयर्नमॅन ट्रायथ्लॉन
 
नवी दिल्ली, 
जगभरातील अत्यंत कठीणपैकी एक मानली जाणारी आयर्नमॅन ट्रायथ्लॉन पूर्ण करण्याचा इतिहास सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफच्या ३५ वर्षीय अधिकार्‍याने घडवला आहे. सहाय्यक कमांडंट Harish Kajla हरीश काजला देशाच्या सीमांचे रक्षण सर्वांत मोठ्या दलात म्हणजे बीएसएफमध्ये २०१२ मध्ये सहभागी झाले. सध्या ते दहशतवादविरोधी कमांडो फोर्स नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये (एनएसजी) प्रतिनियुक्तीवर आहेत.
 
 
harish
 
Harish Kajla हरीश काजला यांनी डेन्मार्कच्या कोपनहेगन येथे आयोजित आयर्नमॅन ट्रायथ्लॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून देश आणि दलाचा नावलौकिक वाढवला. आयर्नमॅन ट्रायथ्लॉनचे खडतर आव्हान पूर्ण करणारे ते केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील पहिले ठरले आहेत, असे बीएसएफने एक्स हॅण्डलवर म्हटले. काजला यांना ही शर्यत १२.४२.२५ या वेळेत पूर्ण करणे शक्य झाले, अशी माहिती बीएसएफने दिली. आयर्नमॅन ट्रायथ्लॉनमध्ये तीन प्रकार असतात. यात ३.८ किमी अंतर पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमीची पूर्ण मॅराथॉन असते. या स्पर्धेसाठी पुरुषांच्या ३५ ते ३९ वर्षे वयोगटात वेळ १५.४५.०० होती.
Powered By Sangraha 9.0