बदलापूर शाळेची स्वतंत्र चौकशी करा : शंभूराज देसाई

    दिनांक :20-Aug-2024
Total Views |
मुंबई, 
या शैक्षणिक संस्थेची, शाळेची शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वंतत्र चौकशी करण्यात यावी, असा निर्देश ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला असल्यची माहिती ठाण्याचे पालकमंत्री Shambhuraj Desai शंभूराज देसाई यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक‘ार दाखल करून घेण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच हा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे.
 
 
Shambhuraj Desai
 
त्यामुळे याचीही तत्काळ चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना दिला आहे. यात दोषी असणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे Shambhuraj Desai शंभूराज देसाई यांनी सांगितले.
 
आ. किसन कथोरे, मंत्री गिरीश महाजनांचे आवाहन
या भागाचे आमदार किसन कथोर सकाळपासूनच समजावण्याचा प्रयत्न्न करीत होते. तरीदेखील आंदोलन सुरूच असल्याने, सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी तीनच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानक गाठले. त्यांनीही आपल्या स्तरावर आंदोलकांशी संवाद साधला, समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्या भावना रास्त आहेत. मात्र, आपल्या कायद्यात तशी तरतूद नाही. सरकार असे कोणालाही फाशी देऊ शकत नाही. तो न्यायालयाचा अधिकार आहे. जाऊन आपल्याला काहीही करता येणार नाही. जे शक्य नाही, अशी मागणी करून काहीही साध्य होणार नाही. आपण समजून घ्या, आंदोलन मागे घ्या, अशी विनंती महाजन वारंवार करीत राहिले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर महाजन तेथून निघून गेले.