'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
दिनांक :20-Aug-2024
Total Views |
मुंबई,
Stree-2 श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. रिलीज झाल्यापासून चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. ग्रँड ओपनिंगनंतर 'स्त्री २' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने वीकेंडलाही मोठी कमाई करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १५ ऑगस्टच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' ने कमाईच्या बाबतीत झेंडा रोवला आहे. 'स्त्री २' ला वीकेंडच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा झाला आहे. या चित्रपटाने वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले असून, ते अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आहे.
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, शनिवारी 'स्त्री २' चे नेट इंडिया कलेक्शन ४५.७० कोटी रुपये होते. त्याचवेळी, चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने ५८.२० कोटींची जबरदस्त कमाई केली. ४ दिवसांच्या कमाईसह, चित्रपटाचे एकूण नेट इंडिया कलेक्शन २०४ कोटी रुपये झाले आहे. 'स्त्री २' ने ४ दिवसात २०० कोटींचा टप्पा पार करून एक नवा पायंडा पाडला आहे. Stree-2 रिलीजच्या पहिल्या दिवशी, 'स्त्री २' ने ५५.४० कोटी रुपयांचे निव्वळ भारतात कलेक्शन केले होते, तर भारतातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन अपेक्षेपेक्षा दुप्पट होते म्हणजेच ७६.५० कोटी रुपये. शुक्रवारी थोड्या घसरणीसह, चित्रपटाचे नेट इंडिया कलेक्शन ३५.३० कोटी रुपये झाले. मात्र वीकेंडच्या सुट्टीत या चित्रपटाने पुन्हा एकदा तुफान कमाई करून सर्वांनाच चकित केले आहे.
श्रद्धा आणि राजकुमार रावच्या चित्रपटासोबत आणखी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेद', पण 'स्त्री २' च्या झंझावातात दोन्ही चित्रपट सपाटून गेले. 'स्त्री २ ' चा झेंडा वरच्या बाजूला फडकत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवी क्रांती आणली आहे, असेच म्हणावे लागेल. वीकेंडनंतर या चित्रपटाला रक्षाबंधनाच्या सुट्टीचाही पुरेपूर फायदा मिळण्याची शक्यता आहे. Stree-2 पहिल्या सोमवारी हा चित्रपट किती कलेक्शन करतो हे पाहणे रंजक ठरेल. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी 'स्त्री २' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. तुम्हीही 'स्त्री २' पाहण्याचा विचार करत असाल तर उशीर न करता पहा.