प्रशासनाची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

    दिनांक :22-Aug-2024
Total Views |
वर्धा, 
Wardha Marathi News : सेलडोह ते सिंदी (रेल्वे) मार्गावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडल्याने आज गुरुवार 22 रोजी ऑटो चालकांनी प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध केला. येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
 
 
YATRA
 
 
सेलडोह ते सिंदी मार्गात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक ओरडत आहे. परंतु, निर्ढावलेले प्रशासन जनतेच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. या जिवघेण्या खड्ड्यांमुळे कमरेचे व मणक्याचे आजार होत आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ऑटोचालकांनी प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. येत्या आठ दिवसात या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.