कल्याणेश्वर मंदिरात शिवभक्तीचा जागर

    दिनांक :22-Aug-2024
Total Views |
नागपूर,
Kalyaneshwar Mandir तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर महाल येथे श्रावण मासानिमित्य नागपुरातील महिला पुरुष भजनी मंडळांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन २४ व २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ ते संध्या ६ पर्यंत करण्यात आले असून भजन स्पर्धेचे उद्घाटन मधुरा गडकरी यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रवीण दटके ,आमदार विकास कुंभारे, विश्वमांगल्यच्या डॉ. राधा कमावीसदार ,भाजपचे मध्य मंडळ अध्यक्ष श्रीकांत आगलावे, अर्चना डेहनकर, कविता इंगळे आदी मान्यवर उपस्थित राहतील. एकूण १८१ भजनी मंडळांनी सहभाग घेतला असून त्यातील ११ उत्तम भजनी मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.
 
mandir 
स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ मधे संपन्न होणार असून बक्षीस वितरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शुभहस्ते संपन्न होईल. Kalyaneshwar Mandir विजेत्या ११ भजनी मंडळांना प्रथम ११०००/- द्वितीय ७०००/- तृतीय ५०००/- चतुर्थ ४०००/- पांचवे ३०००/- सहावे २५००/- सातवे २०००/- आणि १०००/- प्रति ४ उत्तेजनार्थ असे ११ भव्य रोख पुरस्कार आणि गौरवचिन्ह , गौरव पत्र आदी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. कल्याणेश्वर येथील स्पर्धेचे संयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे असून आयोजन समितीत बानाबाकोडे, गुणवंतराव पाटील, रेखानिमजेश्वेता निकम भोसले, आणि समितीचे सर्व पदाधिकारी आयोजनासाठी विशेष प्रयत्न घेत आहेत.
सौजन्य:  श्रीरंग वराडपांडे, संपर्क मित्र