मानसिक विकृती

22 Aug 2024 05:10:29
वेध
 
- नीलेश जोशी
rape-sexual assault-India देशात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मातृपूजनाची संस्कृती असलेल्या आमच्या देशाची ही सांस्कृतिक परंपरा. त्यातही दुर्गोत्सवासाठी विशेष ओळख आहे, ती पश्चिम बंगालची. नवरात्रीतील नऊ दिवसांसह वर्षभर परमेश्वराची आराधना करीत असताना ‘मातृरुपेणं संस्थिता' असे मागणे त्या जगन्नियंत्याकडे आपण मागत असतो. rape-sexual assault-India ही आनंददायी आणि अभिमानास्पद बाब असतानाच दुसरीकडे मात्र देशात घडणाऱ्या घटना मन पिळवटून टाकणाऱ्या  आहेत. ज्या पश्चिम बंगालमध्ये देशात नव्हे, जगात सर्वात मोठा दुर्गोत्सव साजरा होतो, त्याच पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात निवासी डॉक्टरवर अमानुष अत्याचार होतो. या वेदनादायी वृत्ताची शाई वाळण्यापूर्वीच परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात बदलापूर शहरात बालवाडीत शिकत असलेल्या दोन चिमुकल्या मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्याचे वृत्त येते.rape-sexual assault-India
 
 
 
rape-sexual assault-India
 
 
त्यातून सावरत असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील काजीखेड येथे एका शिक्षकाने त्याच्या सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवत त्यांच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या घटना मन सुन्न करणाऱ्याच! जिला आम्ही माता म्हणतो, जिच्या रक्षणाचा संकल्प दरवर्षी रक्षाबंधनातून घट्ट करतो, तिचे लचके जेव्हा तोडले जातात. rape-sexual assault-India कुठे एक जण तर कुठे माणसांच्या रूपात असलेला हिंस्त्र कळप तिच्यावर तुटून पडतो. कधी अनपेक्षित तर कधी कट रचून नराधम डाव साधतात तेव्हा या नरपशूसाठी अत्यंत कठोर, विकृतांच्या विकृतीला जरब बसविणारी शिक्षा तातडीने व्हावी, अशी भावना प्रत्येकाची असते. यात दोषी असणाऱ्याची पृष्ठभूमी काहीही असो, त्याचा जात, धर्म, पंथ याचा विचार न करता शासन-प्रशासनाने या जनभावनेची अंमलबजावणी ही रास्त अपेक्षा असते. ती योग्यच आहे. पण ज्यावेळी या अपेक्षेला छेद देण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जनक्षोभ उसळतो. ही अत्यंत स्वाभाविक भावना आहे.
 
 
 
rape-sexual assault-India कोलकाता येथे आरजी कार मेडिकल कॉलेज येथील घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. त्यानंतर ही घटना आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न केला गेला. एवढेच नव्हे, तर पीडितेच्या पालकांना मृतदेह पाहू दिला नाही आणि त्यावरही कळस म्हणजे सकाळी घटना उघडकीस येऊनही रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिस तक्रार नोंदविली गेली नव्हती. पीडितेचा शवविच्छेदन अहवाल तर सुन्न करणारा आहे. शेवटी कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने याची सुनावणी स्वत:कडे घेतली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित करून जाब विचारला. rape-sexual assault-India पण कोडग्या राज्य शासनाने कुणाला तरी वाचविण्याच्या प्रयत्नात माणुसकीच्या सर्व मर्यादा पार केल्याचे दिसून येते. कारण अद्याप या प्रकरणातील सत्य समोर आले नाही. पण दुसरीकडे याबाबत माध्यमांशी संवाद साधणाऱ्या व्यक्तींना राज्य शासन नोटीस बजावते.
 
 
 
दुर्दैव म्हणजे हा सर्व घटनाक्रम पश्चिम बंगालमधील असून तेथील मुख्यमंत्रिपद महिला भूषवित आहे. दुसरी घटना मुंबईनजीक असलेल्या बदलापूरची. येथे नकळत्या वयातील चिमुकलींचे लचके तोडणारा पिशाचचे काळे कारनामे समोर आले. दुर्दैवाने येथेही पोलिस अधिकारी असलेल्या महिलेने तक्रार दाखल करून घेण्यास उशीर केला. म्हणूनच जनक्षोभ उसळला. rape-sexual assault-India पण राज्य शासनाने त्याची तत्काळ दखल घेऊन दोषी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोेषणा केली. एवढेच नव्हे, तर हा खटला जलद न्यायालयात चालविण्याचे सांगितले. राज्यातील दुसऱ्या घटनेतील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे. अर्थात एवढे पुरेसे नसून अशी विकृती असणाऱ्यांना जरब बसावी अशी शिक्षा या घटनेतील आरोपींना होणे आवश्यक आहे.
 
 
rape-sexual assault-India नवरात्रौत्सवासह रक्षाबंधन, भाऊबीजच्या माध्यमातून मातृपूजनाचा भाव रुजविणाऱ्या आमच्या संस्कृतीत ही विकृती का फोफावतेय, याची चिंता सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. यासाठी समाज व्यवस्थेत आधुनिकतेच्या नावाखाली धुडगूस घालणाऱ्या अनेक बाबी कारणीभूत आहेत. त्यातही मोबाईलमधून नको त्या बाबी पाहण्याचा छंद अनेकांना कळत्या-नकळत्या वयात लागल्याचे दिसून येते. यातून उद्दीपित होणाèया विकृत भावना हेही एक कारण आहेच. या मानसिक विकृतीला आळा घालण्यासाठी कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीसह समाजात नैतिक मूल्यांच्या रुजवणुकीचे प्रयत्न आवश्यक आहेत.
९४२२८६२४८४
Powered By Sangraha 9.0